Kirit Somayya On Aditya Thackeray : पुणेमध्ये 'ब्लॅक लिस्ट' केलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटलला मुंबईतील वरळी येथील जम्बो कोविड सेंटरचा कंत्राट देण्यात आला होते. हे कंत्राट माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून दिल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार तथा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी लावून धरली आहे. (Latest Marathi News)
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही कंपनी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "कोरोना काळात पुण्यात ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कंत्राट दिले होते. त्यांना कोणत्या आधारावर कंत्राट दिले, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला. पुण्यातील सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीला दिले होते. मात्र त्यावेळी लाईफ लाईन हॉस्पिटलच्या संदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने या संबंधित अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. त्यानुसार या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते."
मुंबई पालिकेच्या आयुक्तांसह सर्व आधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे. ते म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेने या कोरोनाच्या काळामध्ये 3 हजार 800 कोटी रुपये कोविड सेंटर उभारण्यात खर्च केले होते. या सर्व प्रकरणांमध्ये एक हजार कोटी रुपयांवर गैरव्यवहार झाला. या सर्व प्रकरणाची 'कॅग'द्वारे चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी चौकशी करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता या प्रकरणात इकबाल चहल यांच्यासह महापालिकेतील या संबंधित इतर अधिकाऱ्यांची चौकशी करावी."
पाटकरांसाठी बोगस बिले तयार केल्याचाही आरोप सोमय्यांनी केला आहे. ते म्हणाले,"खासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार असलेले सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला 100 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामधील 32 कोटी 60 लाख रुपयांचे बिलही महापालिकेने दिले. त्यापैकी 13 कोटी रुपये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने सुजित पाटकर व अन्य भागीदारांच्या खात्यात वर्ग केले होते. त्यापैकी 10 कोटी 25 लाख रुपयांचे बोगस बिले तयार करण्यात आली आहे. या कंपनीची फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. हा पैसा कुठे गेला, या संदर्भातील चौकशी करण्यात यावी."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.