MLA Fund Loot : अशी ही बनवाबनवी! चक्क आमदार निधीच्या लुटीचा प्रयत्न; गुन्हा दाखल

BJP MLA In Maharashtra : आमदाराची खोटी सही करून दीड कोटी निधी मंजूर करण्याची विनंती
MLA Fund try thief
MLA Fund try thiefSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दरोडे, घरफोड्या, चोऱ्या, लूट हे प्रकार आपल्या आवतीभोवीत दरोरोज घडतात. आता रीतसर पत्र देऊन आमदार निधीवरच डल्ला मारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बनवाबनवी वेळीच लक्षात आल्याने आमदार निधीतील दीड कोटी रुपयांची होणारी फसवणूक रोखता आली. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून आमदार निधीसाठी आलेले प्रत्येक पत्राची शहानिशा करण्यात येत आहे. (Latest Political News)

भाजपच्या (BJP) एका आमदारांच्या नावाची खोटी पत्र विकास निधीसाठी वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदारांच्या नावाने तीन पत्रे देऊन चक्क दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. बनवाबनवीचा हा प्रकार लक्षात आल्याने प्रशासनाची होणारी फसणूक टाळता आली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सखोर तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

MLA Fund try thief
Sudhir Mungantiwar On INDIA : मोदींच्या नरडीचा घोट घेणाऱ्यांचीच तिरडी वर जाईल; मुनगंटीवार 'इंडिया'वर गरजले..

या प्रकारणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा नियोजन कार्यालयास भाजपच्या एका आमदाराचे लेटर पॅडवर खोटी स्वाक्षरी करून वेगवेगळ्या तारखेची तीन पत्र जमा करण्यात आली होती. या पत्राद्वारे जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी मंजुरीसाठी विनंती करण्यात आली होती. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय फोर्ट यांनी शहानिशा केली. त्यावेळी ही पत्रे आणि सही खोटी असल्याची माहिती स्पष्ट झाली. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Crime News)

MLA Fund try thief
Parliament Special Session: मोठी बातमी! मोदी सरकारने बोलावले संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन

या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत का, याचीही पोलीस चौकशी करत आहे. या प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक निवेदनाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com