Parliament Special Session: मोठी बातमी! मोदी सरकारने बोलावले संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन

Central Govt : संसदेचे विशेष अधिवेशन बोलाण्यात आल्यामुळे मोदी सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता
Modi Govt
Modi GovtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारने हे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अधिवेशनात नेमकं मोदी सरकार काय मोठे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Modi Govt
Abhijeet Patil Meet BJP Leader : सुप्रिया सुळेंनी राखी बांधलेल्या अभिजीत पाटलांनी घेतली भाजप नेत्याची भेट

या पाच दिवसांच्या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होणार असून या 10 विधेयकं देखील मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच काही महत्वाच्या विधेयकांना मंजूरीही देण्यात येण्याची शक्यता आहे.

संसदेच्या या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात पाच बैठका होणार आहेत. 17 व्या लोकसभेचे 13 वे हे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261 वे हे अधिवेशन असणार आहे. असे असले तरी या अधिवेशनात नेमकी काय चर्चा होणार, कोणते मोठे निर्णय होणार, हे अधिवेशन कशासाठी बोलावण्यात आले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.