Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest News
Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest NewsSarkarnama

'सामना'तील टीका भाजपच्या जिव्हारी; मुनगंटीवार म्हणाले, हे वृत्तपत्र नसून...

Sudhir Mungantiwar : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सामनाच्या अग्रलेखावर टीका केली आहे.

नागपूर : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून विविध राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन लोटस'चा आजच्या अग्रलेखामधून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेप्रमाणेच भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती वाटते, अशी टीका सामनातून करण्यात आली.

दरम्यान, यावर भाजप (BJP) नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून 'सामना (Samana) हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॅम्प्लेट आहे. त्या पॅम्प्लेटमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ राजकीय टीका केली जाते,अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray, Samana Latest News)

Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest News
गुलाम नबी आझादांची पुढील राजकीय वाटचाल ठरली..केली मोठी घोषणा...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,'सामना' हे वर्तमानपत्र नसून एका पक्षाचं पॅम्प्लेट आहे. त्या पॅम्प्लेटमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ राजकीय टीका केली जाते. गेली अडीच वर्षे बघितलं तर या वर्तमानपत्रात जनतेचे प्रश्न मांडले गेले नसून फक्त विरोधकांवर टीकाच केली जात आहे, अशा शब्दात त्यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray Latest News
Navneet Rana | दहीहंडीत आदिवासी गाण्यावर केले नृत्य

सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे असे जे सुरू आहे त्यामुळे विष्णूचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम झाले. ‘ऑपरेशन लोटस’ म्हणजे ‘कमळ’ हा अल-कायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्षाचा लढा सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यामुळे महाविकास आघीडीचे नेते आणि भाजप, शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. शिवसेची बाजू सातत्याने लावून धरणारे शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र सामनाच्या अग्रलेखाची धार काही कमी झालेली दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com