या बिल्डरच्या मदतीने शिंदेंनी आमदारांना सुरतला नेले; खोक्यांची व्यवस्थाही : शिवसेनेच्या दाव्याने खळबळ

Shiv Sena News : शिवसेनेच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Shivsena's Rebellious MLA
Shivsena's Rebellious MLASarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (ShivSena) बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडले. एकनाथ शिंदे यांनी ही बंडखोरी एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या मदतीने केली असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाने केला आहे. इतकेच नाही तर सर्व बंडखोर आमदारांना आधी सुरतला व तिथून गुवहाटीला नेण्यामागे या बांधकाम व्यवसायिकाचा हात होता असा, दावाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केला आहे.

'सामना'च्या अग्रलेखामधून एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीय बांधकाम व्यवसायिकाचा थेट उल्लेख करत ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक अजय आशर यांच्या नावाचा उल्लेख करत शिवसेनेने शिंदेंना लक्ष्य केले आहे. 'एखादे सरकार रामभरोसे चालते असे नेहमीच बोलले जाते. मात्र, महाराष्ट्राचे मिंधे सरकार हे नवस-आवस, तंत्र-मंत्र यावर चालले आहे, असा हल्लाबोल करण्यात आला आहे.

Shivsena's Rebellious MLA
Vasant More news: अजितदादांच्या ऑफरनंतर वसंत मोरेंचे सूचक विधान, म्हणाले...

त्यामुळे विरोधी पक्षाला या गंडे-दोरे-ताईतवाल्या सरकारविरोधात रान उठवावे लागेल. बेळगाव महाराष्ट्रात येवो असा नवस करण्यासाठीशिंदे मंत्री-आमदारांना घेऊन पुन्हा एकदा गुवाहाटीला का जात नाही, असा सवाल करण्यात आला आहे. शिंदे यांनी त्यांचे मित्र बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली आहे, अशा शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.

अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती महाराष्ट्रात असताना नीती आयोगाप्रमाणे काम करण्याची अपेक्षा असलेल्या या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आशर यांची निवड कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 'नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे 'मित्र' (महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ती बहुधा या अजय आशर महाशयांसाठीच. महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर नेमले ते खोके सरकारचे 'टेकू' असलेल्या आशर यांना.

आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला 'हिसाब-किताब' झाल्यावरच गुवाहाटीला गेले. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष झालेत. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्री करू शकतात,'' असा खोटक टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लावण्यात आला आहे.

Shivsena's Rebellious MLA
Jalna : दोन वर्षांपुर्वी माफी मागितली होती, आता पुन्हा मागतो..

आशर यांच्यावर विधानसभेत भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली होती. नगरविकास खात्याचे मंत्री फक्त नावालाच आहेत, खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय परभारे घेतात, आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक व उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपला न जुमानता घेतले व शेलारमामा हात चोळत बसले, असा टोलाही लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com