Devendra Fadanvis : पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadanvis : सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलिस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadanvis : राज्यात 20 हजार पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशातच शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शुक्रवारी शिबिरात दिली. (Devendra Fadanvis latest news)

राज्यातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा (Cyber and Financial Crimes)घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत देशभरातील विविध राज्यांचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर हरयाणातील सुरजकुंड येथे आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Uddhav Thackeray पुन्हा अॅक्शन मोडमध्ये ; पक्षबळकटीसाठी बैठकांचा सपाटा

फडणवीस म्हणाले, "राज्यात 20 हजार पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईला गती देण्यात आली असून, यात केंद्र सरकारची मोठी मदत मिळत आहे. शहरी नक्षलवादाचा धोका मोठा आहे. त्याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांतून अपराध सिद्धीचा दर वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. सागरी सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात येत आहे,"

"अलिकडच्या काळात आर्थिक आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत येणार्‍या काळात कदाचित या गुन्ह्यांचीच संख्या अधिक असेल. ही संस्था आधीच त्यादृष्टीने सज्जता असेल," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

"सायबर इंटिलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालणारे जागतिक मॉडेल तयार होईल. सरकारी आणि खाजगी बँका, वित्तीय संस्था, सोशल मीडिया संस्था, नियामक संस्था, सायबर पोलिस, तंत्रज्ञ असे सर्व या व्यासपीठावर एकत्रित राहणार असून, त्यातून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार आहे," असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com