Shivsena News : मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का! आणखी एक महिला नेत्या शिंदे गटात प्रवेश करणार

Eknath Shinde and Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्या बाजून वळवण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करत असतानाच मुंबईतील शिवेसेना उद्धव ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News, 25 August : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पदाधिकारी आणि नेत्यांना आपल्या बाजून वळवण्यासाठी राजकीय नेते प्रयत्न करत आहेत.

अशातच मुंबईतील शिवेसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका संध्या विपुल जोशी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर त्यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

संध्या जोशी यांचा राजकीय प्रवास

संध्या जोशी (Sandhya Joshi) या मुंबई महानगरपालिका वार्ड क्रमांक 18 च्या नगरसेविका आहेत. त्या आज रविवारी (ता.25 ऑगस्ट) संध्याकाळी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संध्या जोशी या तीन टर्म नगरसेविका आहेत. पहिल्या दोन टर्म त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. 2

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Narendra Modi : सगळ्यांचा हिशेब व्हायला पाहिजे! ‘बदलापूर’चा उल्लेख न करता पंतप्रधान मोदींचं मोठं विधान...

2016 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वीच या भागातील रिद्धी खुरसुंगे आणि गीता काशीद या दोन नगरसेविकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. अशातच आता जोशी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

uddhav thackeray, eknath shinde
TOP-Ten-News-1
dharashiv shivsena
Daryapur Nagar Parishad Shivsena   .jpg
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com