Dawood Ibrahim Mumbai property case : दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरण; नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका

Court Finds Sufficient Evidence Against Ajit Pawar & Nawab Malik in Dawood Ibrahim Mumbai Property Financial Irregularities Case : नवाब मलिकांविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने मलिक यांचा दोषमुक्त करण्यास नकार दिला.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai property scam case : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे.

निरीक्षण नोंदवता, विशेष न्यायालयाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना दणका दिला आहे. नवाब मलिकांविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने मलिक यांचा दोषमुक्त करण्यास नकार दिला.

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी गुन्ह्यात दोषमुक्तीसाठी अर्ज न्यायालयात दाखल केला होता. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खटला हा अंदाज आणि तर्कांवर आधारित असल्याचा दावा मलिक यांनी अर्जाद्वारे केला होता. खासदार-आमदारांच्या प्रकरणांसाठी स्थापित विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी 11 नोव्हेंबरला याचिका फेटाळली होती. त्या आदेशाची प्रत गुरुवारी (ता.13) उपलब्ध झाली.

नवाब मलिक यांनी 'डी' कंपनीच्या सदस्यांसह हसीना पारकर, सलीम पटेल आणि आरोपी सरदार खान यांच्याशी संगनमत करून बळकावलेल्या मालमत्तेच्या आर्थिक गैरव्यवहारात सहभाग स्पष्ट दिसून येत आहे. मालमत्ता 'पीएमएलए' कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली असून, सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी रेकॉर्डवर पुरेसे पुरावे असल्याचेही न्यायालयाने (Court) आदेशात म्हटले आहे.

Nawab Malik
Toll Plaza: केंद्र सरकार 17 वर्षांनंतर टोलच्या नियमांमध्ये करणार मोठे बदल, प्रवाशांना असे होणार फायदे!

या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी फेब्रुवारी 2022 मध्ये 'ईडी'ने मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्याायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला होता.

Nawab Malik
Top 10 News : झालं गेलं गंगेला मिळालं, माझंही साहेबांवर प्रेम,भुजबळांना पुन्हा वगळलं,अखेर महायुती तुटलीच,कंगना रनौत अडचणीत...

मलिक यांच्यावर आरोप काय?

हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बळकावल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ जारी केली.

'ईडी'चा गंभीर आरोप

पटेलने त्याचा दुरुपयोग करून पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कम्पाउंडमधील जमीन नवाब मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे. नवाब मलिक यांनी ही जागा भाडेतत्त्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांतून वांद्रे, कुर्ला इथं सदनिका आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केल्याचा 'ईडी'चा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com