Dawood Ibrahim
Dawood IbrahimSarkarnama

Dawood Ibrahim News : दाऊदच्या फरार नातेवाइकाला ३० वर्षांनंतर अटक; 'डी गँग'ची उलगडणार अनेक गुपितं

Nazir Faki Arrest On Foreign : नझीर फकी जे.जे. हॉस्पिटल गोळीबारातील प्रमुख आरोपी

Mumbai News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नातेवाईक आणि १९९२ च्या जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबारातील प्रमुख फरारी नझीर मोहम्मद फकी याला परदेशात अटक करण्यात यश आले आहे. फकीच्या अटकेमुळे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फकीची अटक ही दाऊदला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (Latest Political News)

दरम्यान, फकीचे कुठलेही छायाचित्र उपलब्ध नसतानाही परदेशात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला जवळपास तीन दशकांनंतर पकडल्याने तपास यंत्रणांचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. दाऊद इब्राहिमने त्याची बहीण हसिना पारकरचा पती इस्माईल पारकर हिच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा वापर केला होता.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, फकीबद्दल माहिती मिळाल्यानंतर, मुंबई गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर फकीच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. फकीला आता अटक केली असून, लवकरच त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Maharashtra Political News)

Dawood Ibrahim
Pimpri Chinchwad Politics : पवना बंद जलवाहिनीचे राजकारण; बंदी उठताच भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवाद उफाळला

कोण आहे नझीर फकी ?

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नझीर पाकिस्तानमध्ये दाऊद आणि छोटा शकीलसोबत राहत होता. मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 1993 च्या बॉम्बस्फोटातही नझीरची भूमिका असल्याचे तपासात समोर आले आहे. नझीरच्या अटकेमुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या दाऊद टोळीबाबत खूप महत्त्वाची माहिती मिळू शकते.

मोस्ट वॉन्टेड नझीर फकी

नझीर मोहम्मद फकी हा जेजे गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी रहीम मोहम्मद फकीचा धाकटा भाऊ आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, रहीमचे लग्न इस्माईल पारकर यांच्या बहिणीशी झाले आहे. इस्माईल पारकर यांची १९९२ मध्ये अरुण गवळी टोळीच्या सदस्यांनी त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या केली होती. १२ सप्टेंबर १९९२ रोजी डी गँगच्या शार्प शूटर्सनी एके-47 ने जेजे हॉस्पिटलवर हल्ला केला.

दोन पोलिस शहीद

पारकर यांच्या दोन्ही मारेकऱ्यांना ठार करण्यासाठी येथे ५०० हून अधिक राऊंड गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात हळदणकर आणि दोन पोलिस हवालदार शहीद झाले. गोळीबाराचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात नझीरने भूमिका बजावली होती. त्या गोळीबारातील वॉन्टेड आरोपींना लपविण्यातही त्याने मदत केली होती. रत्नागिरीतील खेड या मूळ गावी त्याने आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर नझीर पाकिस्तानात पळून गेला होता आणि त्याने तिथे आश्रय घेतला होता.

भारतात कधी आणणार?

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नझीरबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मुंबई क्राइम ब्रँचच्या अपिलानंतर नझीरच्या नावाने आरसीएन जारी करण्यात आला. नझीरला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Dawood Ibrahim
Ulhasnagar Water Meeting : गणपत गायकवाडांनी अधिकाऱ्यांना झापले, व्हिडिओ व्हायरल....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com