Ulahasnagar Political News: उल्हासनगर शहरातील पाणीपुरवठा समस्येवर चर्चा करण्यासाठी मनपा मुख्यालयात बैठक पार पडली. या वेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पालिका अधिकाऱ्यांना झापल्याचा प्रकार समोर आला आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले होते, पण अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तर न दिल्याने गायकवाड चांगलेच संतापले. गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत चांगलेच झापले. याच दरम्यान पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना शिवीगाळदेखील केली. (Ulhasnagar Politics)
या बैठकीत आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शिंदे गटातील आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शिंदे गट महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी महापौर मीना आयलानी आणि अरुण आशाण उपस्थित होते.
पालिका प्रशासन हे सर्व दोष एमआयडीसीवरती ढकलतात, तर एमआयडीसी हे सर्व प्रकरणाला पालिका जबाबदार असल्याचे सांगते. परंतु या समस्येवर मार्ग काढण्यास कोणी बघत नाही. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड हे चांगलेच तापले होते. त्यांनी पालिका अधिकारी हे त्या पदावर बसण्याच्या लायकीचे नसल्याचेदेखील म्हटले आहे. दरम्यान, याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.