NCP Minister Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीत काटे उलट फिरणार..; अजित पवार मनोमिलनासाठीच पवारांकडे ?

NCP News : तशीच मोठी घडामोड आज होणार का,
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळी अधिवेशनाच्या आधीच मोठी घडामोड होत असल्याने राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

दोन जुलैच्या रविवारी राज्यात सत्तानाट्य रंगले होते. तशीच मोठी घडामोड आज होणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. पंधरा दिवसापूर्वी रविवारीच राष्ट्रवादीत फुट पडून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. आज (रविवारी) काय घडते, हे लवकरच समजेल.

Ajit Pawar-Sharad Pawar
NCP Minister Meet Sharad Pawar : मोठी बातमी : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

अजित पवारांनी बंड करुन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. या घडमोडींवर नेटकऱयांनी मिम्स पसरवत रविवार कश्याला खराब केला म्हणुन प्रश्न विचारला होता. आता पुन्हा अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेते बंडानंतर प्रथमतःच शरद पवारांच्या भेटीला वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. तेव्हा आजच्या रविवारी काय घडते? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर दोन्ही गटात मनोमीलन होऊन राष्ट्रवादीत काटे उलटे फिरणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित राहावा, अशी विनंती या गटाने पवारांनी केली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना सांगितले आहे. पवार यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अजित पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, याबाबतची माहिती अजित पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाला दिली आहे. 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर केले आहे. तीस जूनला आमदारांनी अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com