Devendra Fadanvis on Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे , अजित पवार हेच खरे हिरो ; फडणवीसांनी सभागृहात...

Maharashtra Politics : वडेट्टीवार आक्रमक असले तरी मृदू स्वभावाचे आहेत.
Maharashtra Politics News update
Maharashtra Politics News updateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : नवे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या नावांच्या घोषणेने सभागृहातील संघर्ष काहीसा शमून, साऱ्या नेत्यांमधील हेवेदावे संपल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेतेपदाचे महत्त्व पटवून देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास शैलीत कॉंग्रेसमधील गटबाजी, विरोधी बाकांवरच्या नेत्यांमधील राजकारण आणि आपल्या साथीला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ‘टर्म’मधील (२०१९-२४) हिरो असल्याचे सांगितले. या टर्ममध्ये शिंदे, पवारांनी धाडसी राजकारण केल्याचेच फडणवीसांनी सूचित केले.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली, त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. विजय वडेट्टीवारांचे अभिनंदन करताना फडणवीस यांनी विरोधीपक्षनेते पदाच्या परंपरेविषयी सांगितले. वडेट्टीवार यांच्या राजकीय कार्याचा आढावा फडणवीस यांनी घेतला.

फडणवीस यांनी आपल्या पदाबाबत यावेळी सभागृहात भाष्य केले. ते म्हणाले, "आता माझ्या पदात बदल होणार नाही. माझ्यावर जी जबाबदारी आहे, त्यात मी समाधानी आहे. ज्याला न्याय मिळत नाही, तिथं आम्हाला न्याय द्यावा लागतो. वडेट्टीवार आक्रमक असले तरी मृदू स्वभावाचे आहे, विरोधीपक्ष नेतेपदी ते चांगले काम करतील,"

Maharashtra Politics News update
Shivsena 16 Mla Disqualification : सोळा आमदार अपात्रतेची सुनावणी कधी ? सुप्रीम कोर्टानं दीड महिना...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.

"विरोधीपक्षनेता पॉवरफूल असावा लागतो. राज्याला चांगला विरोधीपक्षनेता लाभला आहे, मी त्यांना शुभेच्छा देताना काही जण घाबरले. वडेट्टीवार हे वर्कफॉम होम करणारे नेते नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

"विरोधीपक्षनेता हा भावी मुख्यमंत्री असतो. काल जे विरोधीपक्षनेते होते ते मुख्यमंत्री झाले आहेत . राज्याला अजित पवार यांच्यासारखे विरोधीपक्ष नेते लाभले आहेत, असे शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com