Maharashtra Politics : राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार, असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात (State Govt) घेण्यात आला आहे. या निर्णय़ातून राज्यांतील रस्त्यांची जबाबदारी नव्या महामंडळावर दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या निर्णय़ामुळे राज्यातील रस्ते खड्डेमुक्त रस्त्यांचं मिशन पूर्ण होणार आहे. (Decision of the State Government; Establishment of a new corporation for road development)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. एकट्या मुंबईतच जवळपास ४०० किमीच्या रस्त्यांची कामे सुरू आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहेत. या सर्व कामांवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णायामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होतील. राज्यसरकारच्या या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Maharashtra Politics)
याशिवाय आणखीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत
- कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.दरवर्षी २५ मुला-मुलींना शिष्यवृत्ती.
-घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प राबविणार.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये हा प्रकल्प राबविणार.
- शिरोळ तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणार.
- करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. भारतीय व्याघ्र गणना २०२२ साठी केलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० वर पोहचली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्पाचा देशातील पहिल्या दहा प्रकल्पांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Edited By-Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.