Deepak Kesarkar : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक ; मंत्री केसरकरांचा संताप, म्हणाले...

Maharashtra Primary Education Institute website hacked : मुंबई पोलिस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलेली आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar Politics News : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक झालेली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे. वेबसाईट वापराचे अधिकार शाळा आणि शिक्षकांनाच आहेत. वेबसाईट हॅक करण्याचा वारंवार प्रयत्न झाला आणि साईटवर चुकीची प्रसिद्धीपत्रकं प्रसारित केली गेली आहेत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

याबाबत मंत्री केसकर(Deepak Kesarkar) म्हणाले, हे गंभीर आहे, हे कशाप्रकारे हॅक झालं हे बघावं लागणार आहे. ही समाजातील एक विकृती आहे आणि विकृती ठेचून काढली पाहीजे असं माझं मत आहे. काही लोकांनी आमची साईट हॅक करायचा प्रयत्न केला. यासंदर्भात आम्ही लवकर पोलीस केस दाखल करणार आहोत. तर काही लोकांनी फेक सर्टिफिकेट बनवून शासनाचे बदनामी करायचा प्रयत्न केला, सकाळीच मी पोलीस आयुक्तांबरोबर बोललो आहे. हा शासनाचा आहे आणि मराठी भाषेचा अपमान आहे.

तसेच, शालेय शिक्षण विभागाच्यावतीने वाचनाचा उपक्रम ठेवण्यात येणार आहे . अमिताभ बच्चन यांनी स्वतः मुलांना वाचण्याचे आवाहन केले आहे.

Deepak Kesarkar
Amruta Fadnavis on MVA : ‘माझे कुटुंब माझा मुख्यमंत्री‘ ; अमृता फडणवीसांचा आघाडीच्या नेत्यांना टोला!

याशिवाय, राजकारणाती विविध मुद्य्यांवर बोलताना केसरकर म्हणाले, 'आजपण भाजपाकडे शंभर पेक्षा जास्त आमदार आहेत. मोठा आणि लहान भाऊ ही अशी संकल्पना कोणाच्याही मनात नाही. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस असं धोरण होते की दिल्ली भाजपने(BJP) सांभाळावी आणि महाराष्ट्र शिवसेनेने. मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे नसतील असं बोलून काँग्रेसने त्यांचा अपमान केला. '

Deepak Kesarkar
Baban Shinde Arrested : 'सौ चूहे खा के बिल्ली चली..' ; महाराष्ट्रात तब्बल 300 कोटींचा घातला गंडा अन् मथुरेत जाऊन बनला साधू!

तर भाजपे माजी आमदार राजन तेली यांच्याबाबत बोलताना केसरकर यांनी सांगितले की, 'त्यांनी दोन वेळा माझ्यासमोर निवडणूक लढवली दोन वेळा पराभव झाला. मंत्रिमंडळ माझ्याविरोधात उतरवलं होतं तरी त्यांचा पराभव झाला. याशिवाय लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी(Raj Thackeray) केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केसरकरांनी म्हटले की, 'महिलांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहे. आम्ही सर्व माहिती राज ठाकरे यांना देऊ आणि त्यांच्या गैरसमज दूर केला जाईल.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com