Sanjay Raut: शरद पवारांचा उल्लेख करत राऊतांचं अमित शहांना थेट आव्हान; म्हणाले, "बारामतीत..."

Sanjay Raut On Ajit Pawar: "बारामती-शिरूर मतदारसंघात (Baramati-Shirur Constituency) अजित पवार धमक्या देत आहेत. अशी भाषा असेल तर राज्यातील जनतेनेदेखील काय करायचं ते ठरवलं असून आम्ही सगळे सुप्रिया सुळेंबरोबर आहोत."
Amit Shaha, Sanjay Raut, Sanjay Raut
Amit Shaha, Sanjay Raut, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On Amit Shaha: आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांवर टीका करणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आणि अजित पवारांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांना धमक्या काय देता, आम्ही सगळे सुप्रिया सुळेंबरोबर आहोत, बारामतीत पवारांचा पराभव करुन दाखवा, असं आव्हान राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला दिल आहे. शिवाय यावेळी त्यांनी उज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केलं आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, उज्वल निकम (Ujjwal Nikam) हे उमेदवार असले तरदेखील महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, तसेच महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. राज्यातील 30 ते 35 जागा महामहाविकास आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती-शिरूर मतदारसंघात (Baramati-Shirur Constituency) अजित पवार (Ajit Pawar) धमक्या देत आहेत. अशी भाषा असेल तर राज्यातील जनतेनेदेखील काय करायचं ते ठरवलं आहे. मतदारसंघात गावागावात जाऊन लोकांना धमक्या कसल्या देत आहेत. बारामतीमध्ये शरद पवारांचा (Sharad Pawar) पराभव अमित शहा यांनी करून दाखवावा, असं आव्हानच राऊतांनी दिलं. शिवाय आम्ही सगळे सुप्रिया सुळेंच्यासोबत (Supriya Sule) आहोत असंही राऊत म्हणाले.

Amit Shaha, Sanjay Raut, Sanjay Raut
Manoj Jarange Patil: प्रकाश शेंडगे शाईफेक प्रकरणावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, "ते मराठ्यांच्या मागे..."

2019 ला पार्थ पवार का जिंकू शकले नाहीत

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे राजकारण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पेटला आहे जागोजागी लोक कांदा फेकून मारतील असा इशाराही राऊतांनी दिला. तसेच 2019 ला पार्थ पवार का जिंकू शकले नाहीत, शिवाय बारामतीमध्ये इतकं काम केले हे पवार साहेबांच्यामुळेच तुम्ही करू शकाल ना? असं म्हणत राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com