संभाजीराजेंच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा.. केजरीवालही राहिले पाठीशी उभे!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.
Sambhajiraje Chhatrapati Hunger Strike
Sambhajiraje Chhatrapati Hunger Strike Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Marathi Reservation) मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhijiraje Chhtrapati) आता आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण प्रलंबित असल्याने त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांसह नेत्यांचा पाठिंबा मिळत आहेत. याता आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भर पडली आहे. (Sambhajiraje Hunger Strike)

काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी उपोषण करण्याची घोषणा केली होती. आजपासून त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, मी महाराजांचा वंशज असून, हा लढा मला लढायलाच हवा. हा निर्णय माझा आहे. मी अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या केल्या पण सरकारने शब्द पाळला नाही. सरकारने शब्द न पाळल्याने माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी उपोषण सुरू केले आहे. मी 17 जूनला केल्या होत्या, त्याच मागण्या आताही आहेत. त्यात तसूभरही बदल केलेला नाही. सरकारने अद्याप या मागण्या मान्य केलेल्या नाहीत.

संभाजीराजेंच्या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या तुळजापूर येथे करणार लक्षणिक उपोषण करणार आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी संभाजीराजेंना पाठिंब्याचे पत्र पाठवले आहे.

Sambhajiraje Chhatrapati Hunger Strike
नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडेंचे फोन रश्मी शुक्लांनी केले टॅप

मराठा आरक्षणासाठी 2007 पासून मी महाराष्ट्रात फिरत आहे. मराठा आरक्षण का महत्वाचं आहे, याची जाणीव मराठा समाजात निर्माण केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाला सोबत घेऊन गेले नाहीत तस सर्व समाजाच्या १८ पगड जातींना सोबत घेऊन पुढे गेले. पण आज सरकारच्या नाकर्तेपणामुळे मला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागत आहे. आरक्षण मिळेपर्यंत गरीब मराठा समाजाने काय करायचे? असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला. आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. आमरण उपोषण करणे कठीण काम आहे. पण आत्ता जर काही केले नाही तर काय उपयोग, म्हणून मी उपोषण करत आहे, असेही संभाजीराजेंनी नमूद केले.

Sambhajiraje Chhatrapati Hunger Strike
विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटणार; चव्हाण, थोपटे की वरपुडकर?

राज्य सरकारने 15 दिवसांत आरक्षणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. म्हणून मी उपोषणाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला 400 कोटींच्या निधीची घोषणा केली. त्यापैकी सुरवातीला 50 कोटी आणि नंतर 30 कोटी आले, आता परतावा करायला पैसे नाहीत. आरक्षणाचा विषय जितका महत्वाचा तितकाच सारथीचा विषय महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने अनेक सारथीची केंद्रे सुरु केली. पण तेथील अडचणी सोडवल्या गेल्या नाहीत, असे संभाजीराजे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com