Sharad Pawar News : अशा क्रूरतेमुळे लोकशाही मूल्ये अपमानित; पवारांनी मोदी सरकारला सुनावलं !

Sharad Pawar Delhi wrestler protest : देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक...
Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Sarkarnama

Sharad Pawar News : देशाची राजधानी दिल्लीत काल नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, दुसरीकडे महिला कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. नव्या संसदेचं लोकार्पणाच्या दिवशीच दिल्लीतील कुस्तीपटूंचं आंदोलन चिघळलं.

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंवर भररस्त्यात बळाचा वापर करत दिल्ली पोलिसांनी त्यांचं आंदोलन मोडीत काढलं. पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर झटापट झाली. यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत निषेध व्यक्त केला आहे

Sharad Pawar News :
Sambhajiraje Chatrapati गौतमीच्या आडनावाबाबत स्पष्टच बोलले | Gautami Patil | Sarkarnama Video

शरद पवार यांनी ट्वीट करत कुस्तीपटूंना झालेल्या धरपकडीच्या कृत्याचा निषेध केला आहे. ट्वीट करत ते म्हणाले,"लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी न्याय मागत असलेल्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या देशाची शान असलेल्या कुस्तीपटूंना अशाप्रकारे वर्तणूक देणे आणि ताब्यात घेणे अत्यंत निषेधार्ह आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या क्रूरतेच्या कृत्याने आज आपली लोकशाही मूल्ये अपमानित झाली आहेत," अशा आशयाचं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळेंचंही ट्वीट -

याच प्रकरणावर आपलं मत व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला प्रश्न केला आहे. सुप्रिया सुळे ट्वीट करत म्हणाल्या की, “ऑलम्पिक विजेत्या खेळाडूंना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खूप निराश झालो आहोत. साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्याशी झालेलं गैरवर्तन निंदणीय आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारण्यास परवानगी दिली होती का? यांचं केंद्र सरकारने उत्तर द्यावं.” असे सुळे म्हणाल्या.

Sharad Pawar News :
Wrestler Protest : '' ब्रिजभूषण यांच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी पोलिसांना सात दिवस,पण..''; साक्षी मलिकचं संतप्त ट्विट

न्यायाची याचना करणारे खलनायक आहेत का?

"ज्या खेळाडूंनी आपल्या खेळातून देशाला सन्मान मिळवून दिला, त्या देशाचा अभिमान असणाऱ्या खेळाडूंना न्यायासाठी लढाई करावी लागत आहे. हे खरोखर दुर्दैवी आहे. त्याच खेळाडूंचा विजयानंतर देशातील सर्वांनीच त्यांच्या सत्कार केला आहे . मग ते न्याय मागताना आता खलनायक वाटत आहेत का? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com