मी बेईमान नाही!; सगळ्यांचीच नावे लवकरच जाहीर करणार अजितदादांचा इशारा

राज्यात भाजपचे सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली.
Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Sugar factory) व्यवहारांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विरोधकांकडून विविध आरोप करण्यात येत आहेत. यावरून आता अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांना आता थेट इशारा दिला आहे. राज्यात फक्त जरंडेश्वर साखर कारखान्याचाच व्यवहार झालेला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे, उद्या सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सांगेन, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

या वेळी बोलताना पवार यांनी आरोप फेटाळून लावत विरोधकांनाच लक्ष्य केले. उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता राजकीय वर्तूळात चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार नेमकी कोणती माहिती उघड करणार असा प्रश्न विचारला जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याची केस ईडीकडे आहे. न्यायालयात प्रकरण आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना सीआयडी, एसीबीची चौकशी झाली. इओडब्ल्यूची चौकशी झाली. निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली आहे. फक्त जरंडेश्वर कारखाना विकला गेलेला नाही. माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे. सगळी कागदपत्र देखील माझ्याकडे आहेत. राज्यात सुरुवातीपासून किती कारखाने, कुणाच्या कारकिर्दीत किती किमतीला विकले गेले याची माहिती देईन. काही कारखाने ३ कोटी, ४ कोटी अशा किमतीला विकले गेले, असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar
मोठी बातमी : एकनाथ खडसेंना न्यायालयाकडून दिलासा

आपण कोणतीही बेइमानी केलेली नाही. अनेक कारखाने चालवायला देखील दिले जात आहेत. आजही राज्यात १२-१३ कारखाने चालवायला देण्याचे टेंडर निघालेले आहे. काहीजण जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळी आम्ही माध्यमांसमोर जात नाही. मी कमीत कमी माध्यमांसमोर जाणारा व वस्तुस्थितीला धरून चालणारा माणूस आहे, असे पवार म्हणाले. माझ्याविरुद्ध काही लोकांनी गरळ ओकण्याचे देखील काम केले. मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांचीही अशी बदनामी केली गेली. त्यांचा दोन वर्षांचा काळ वाया गेला. नंतर ते निर्दोष सुटले. मी ९० सालापासून राजकारणात काम करत आहे. उभा महाराष्ट्र मला ओळखतो मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का आहे. मी खोटे बोलणार नाही. आमच्या रक्तामध्ये बेईमानी नाही, असे अजित पवार यांनी ठणकाऊन सांगितले.

Ajit Pawar
नाना पटोलेंचा दणका, एकाचे निलंबन

मी आजच पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, आज मला काम आहेत. उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. त्यात दाखल्यासहीत सगळे सांगेन. काही बिल्डर, शेतकरी, राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांनीही कारखाने चालवायला घेतले आहेत. पण त्यांच्याबद्दल बोलले जात नाही. मात्र, माझ्या नातेवाईकांबद्दल बोलले जाते, असे देखील पवार म्हणाले. केरळ सरकारने केंद्रीय संस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशात सरकारे येतात जातात. आपण अनेक सरकारे बघितली आहेत. केंद्राने आपले अधिकार आहेत त्यानुसार काम करावे. राज्यांच्या बाबत मनात आकास न ठेवता यंत्रणेचा गैरवापर करता कामा नये. असे माझे मत आहे, असेही पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com