मोठी बातमी : एकनाथ खडसेंना न्यायालयाकडून दिलासा

जमीन गैरव्यवहारप्रकरणी (money laundering case) एकनाथ खडसे (eknath khadse) यांची चैाकशी सुरु आहे. दोन दिवसापूर्वी खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.
 Eknath khadse
Eknath khadsesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (bombay hc) दिलासा दिला आहे. भोसरी (पुणे) येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी (money laundering case) त्यांची चैाकशी सुरु आहे. दोन दिवसापूर्वी खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.

या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. याप्रकरणी खडसे यांना एक आठवडा अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एकनाथ खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पण या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.

 Eknath khadse
भाजपच्या माजी आमदाराचा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या

भोसरी येथील जमीन ३ . ७५ कोटी रुपयांनी खरेदी केली होती. पण प्रत्यक्षात त्यांची किमंत ३१.०१ कोटी रुपये होती. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झालं असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप ‘ईडी’ने केला आहे. या जमीन व्यवहारात खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी एप्रिल २०१६ मध्ये ही जमीन खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक आहेत.

भाजपला मोठा धक्का; रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) भाजपला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तसेच माजी आमदार स्मिता वाघ (Smita Wagh) यांचाही एका गटातील अर्ज बाद करण्यात आल्यानं राष्ट्रवादीचे (NCP) निवडणुकीतील पारडे जड झाले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांचाही अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com