Devendra Fadnavis On Sharad Pawar: 'अजितदादा बाहेर का पडले ? पवारसाहेबांना सगळं माहिती'; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

BJP and NCP : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला
Devendra Fadnavis and Sharad Pawar
Devendra Fadnavis and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या दाव्यांवर उद्या सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार बाहेर का पडले हे पवारसाहेबांना माहिती आहे, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

'२०१९ ला पवारसाहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी ते कुठल्या एजन्सीला घाबरून येत होते का ? त्यापूर्वी २०१७ लाही पवारसाहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही ते कुठल्या एजन्सीला घाबरून येत होते का ? खरं तर पक्षातील लोक बाहेर का पडले ? हे पवारसाहेबांना माहिती आहे', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis and Sharad Pawar
Bacchu Kadu News : कार्यकर्त्यांचा हट्ट अन् बच्चू कडूंची चुप्पी; ‘प्रहार’चं काय चाललंय भंडारा जिल्ह्यात?

'अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. जेव्हा आमचं सरकार बदललं तेव्हा पवारसाहेबांच्या मान्यतेने सर्व आमदारांनी सह्या करून भाजपसोबत जायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे नेते गेल्यावर आता त्यांच्यावर आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे', असं ते पुढे म्हणाले.

'वास्तविकता लक्षात घ्या'

'जो राजकारणात आहे, त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे, कधी ना कधी संधी मिळणार आहे. अजितदादा राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यामुळे निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, पण सर्वांनी वास्तविकताही लक्षात घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तेच मुख्यमंत्री राहणार आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहोत', असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांनी बोलावली बैठक

निवडणूक आयोगातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाची भूमिका काय आहे ? त्याबद्दल पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. तसंच चिन्ह गोठवलं तर पुढची रणनीती काय असावी ? याबद्दलही चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अॅड. अभिषेक मनू सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Devendra Fadnavis and Sharad Pawar
Nanded Hospital News: नांदेड रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री 'अ‍ॅक्शन मोड'वर; अधिकारी दोषी आढळल्यास कारवाईचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com