Devendra Fadnavis : ''टप्प्यात आल्यावर काय टिपायचं याचा आम्हाला...'' फडणवीसांचं सूचक विधान!

Fadnavis Vs Thackeray : जाणून घ्या नेमकं फडणवीस असं का म्हणाले? ; याशिवाय ''मी एक सामान्य माणूस आहे त्यामुळे...'' असंही ते म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमधील वाइल्ड लाइफ फोटोग्राफी प्रदर्शनाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांनी सिंह आणि वाघ असलेल्या फोटोची स्तुती केली होती व असेही म्हटले होते की कधी काळी वाघ आणि कमळ एकत्र होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''मला सगळेच फोटो आवडले. उद्धव ठाकरे स्वत: एक फोटोग्राफर आहेत, त्यामुळे ते फोटोग्राफरच्या नजरेतून पाहतात. मी एक सामान्य माणूस आहे, त्यामुळे मी सामान्य माणसाच्या नजरेतून पाहतो; पण शेवटी ज्या गोष्टी कॅमेऱ्यामधून टिपून घेतात. पण योग्य टप्प्यात आल्यावर काय काय टिपायचं याचा आम्हाला सराव आहे, त्यावेळी ते ते आम्ही टिपतो.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलं होतं की, ''विकासाच्या नावावर जंगलं नष्ट केली जात आहेत.'' यावर फडणवीस म्हणाले, ''जंगलांना वाचवलं गेलं पाहिजे. यामध्ये काहीच दुमत नाही आणि मला असं वाटतं की, २०१४ ते २०१९ पर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.

जर तुम्ही २०२०मध्ये देशाच्या वन विभागाने जो एक अहवाल प्रकाशित केला तो पाहिला, तर केवळ महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे. ज्यामध्ये एकूण पाच वर्षांत आपल्या वनक्षेत्रात वाढ झाल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात तर आम्ही असाच प्रय़त्न केला आहे, की कशाप्रकारे वनसंपदा वाढवली जाईल.''

तत्पूर्वी फडणवीस म्हणाले, ''डॉ. पांडा यांची देशातील प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक म्हणून ओळख आहे. पण ते तेवढेच सिद्धहस्त छायाचित्रकारसुद्धा आहेत. विशेषता वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये अतिशय सुंदर फोटो त्यांनी काढलेले आहेत. हे आज या ठिकाणी पाहायला मिळालं. हे प्रदर्शन बघितल्यानंतर मला असं वाटतं अतिशय सुंदर असं जे आपल्या निसर्गाचं वैविध्य आहे. विशेषता आपले प्राणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी कॅमेऱ्यात टिपलं आहे. ''

Devendra Fadnavis
Sadabhau Khot : 'गिरे तो भी टांग उपर' ही शेट्टींची अवस्था; सदाभाऊ खोतांनी फटकारलं!

याशिवाय ''हे सगळं वैविध्य लोकांसमोर आलं पाहिजे आणि त्याचं संवर्धनसुद्धा झालं पाहिजे, असाही त्यांचा प्रयत्न असतो. हे सगळं करत असताना या सगळ्यातून जे काय उत्पन्न त्यांना मिळतं. जे लोक वन्य जिवांचं संवर्धन करताता, अशा लोकांच्या भल्यासाठी ते खर्च करतात. त्यांची फोटोग्राफी पाहून मला अतिशय आनंद झाला आहे, मी डॉ. पांडा यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं जे संवर्धनाचं कार्य आहे, त्यासाठी पुढील काळात आम्ही त्यांची मदतही घेऊ, असा विश्वास मी व्यक्त करतो,'' असंही फडणवीस म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com