Ajit Pawar

Ajit Pawar

Sarkarnama

रात्रीच्या लॉकडाऊनची चर्चा अन् अजितदादांनी फडणवीसांसह आमदारांचे टोचले कान

देशभरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढू लागले असून महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत.

मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये (Assembly Winter Session) गुरूवारी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना वरून विरोधी पक्षनेत्यांसह सर्वपक्षीय आमदारांचे कान टोचले. सभागृहात काही अपवाद वगळता इतर कुणीही मास्क लावत नसल्याच्या मुद्यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच देशभरात रात्रीचा लॉकडाऊन (Lockdown) करण्याची चर्चा देशपातळीवर सुरू असल्याचे सांगत पवारांनी कोरोनाविषयी गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन सभागृहाला केले.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाच्या (Corona) नव्या ओमिक्रॉन (Omicron) या विषाणूबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस. तीन ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व आपण करत आहोत. देशाचे पंतप्रधानही त्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहेत. त्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा देशपातळीवर सुरू आहे. काही ठराविक जण सोडले तर कुणीही मास्क लावत नाही.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>
ठाकरेंना धमकीचे कर्नाटक कनेक्शन विधानसभेत गाजले अन् थेट एसआयटीची घोषणा

संपूर्ण महाराष्ट्र इथे काय चाललंय ते पाहत आहेत. काही जणांना बोलताना मास्क काढल्याशिवाय चांगलं बोलता येत नसेल तर तो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. पण बोलून झाल्यावर मास्क लावला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केलं. परदेशातील स्थितीची माहिती देताना पवार म्हणाले, एवढी वाईट परिस्थिती आहे की, परदेशात दीड दिवसांत दुप्पट वेगाने रुग्ण वाढत आहेत. WHO ने सांगितले आहे की, पदेशात पाच लाखांपर्यंत लोक मृत्यूमुखी पडू शकतात.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar</p></div>
भुजबळ वकील असते तर हरीश साळवेंनंतर...! फडवणीसांनी घेतली फिरकी

...तर मलाही बाहेर काढा!

आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे काय? हे गांभीर्याने घ्यावे. इथे बसलेले असताना मास्क लावला नसेल तर मलाही बाहेर काढा. विरोधी पक्षनेते आपणासह सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हेव. कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, असे आवाहन पवारांनी केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही सर्व सदस्यांना मास्क घालण्याची सुचना केली. केवळ बोलण्यापुरतेच मास्क काढावेत, असे त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशात गुरूवारी सकाळपर्यंत 236 रुग्ण होते. त्यापैकी सर्वाधिक 65 महाराष्ट्रात आणि 64 रुग्ण दिल्लीत आढलून आले आहेत. आतापर्यंत एकूण 104 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com