Shiv Sena : शिंदेंचे नाव बदलून 'श्रीमान खापरफोडे' ठेवायला हवे': शिवसेनेचा टोला

Shiv Sena : "वेदांता-'फॉक्सकॉन'ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर POXEO हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

पुणे : वेदांता-फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (Vedanta Foxconn Semiconductor) हा महाराष्ट्रात होणार होता, पण तो गुजरातला हलविण्यात आला आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने स्वीकारलेले धोरणच कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे नेते करीत आहेत.

भाजप सरकार राज्यातील प्रकल्प फायद्यासाठी गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांनी 'वेदांता'वरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्या दावे-प्रतिवादे करण्यात येत आहेत. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

"फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या हवाली केल शिंदेंनी हातावर उदक सोडावा असा हा प्रकल्प सोडला उद्या हे याच पद्धतीने मुंबईच सौदा करण्यासाठी कमी करणार नाहीत,"असा गंभीर आरोप 'सामना'मधून करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
ठाकरेंना फोन करणारे अमित शहा आता मुख्यमंत्र्यांना फोन कधी करणार ? ; सावतांचा खोचक सवाल

"वेदांताबदल राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली पण त्यांच्याच मित्रानी 1 लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प हिरावून घेतला, महाराष्ट्राच्या प्रगतीचे सर्व डबे आणि इंजिन गुजरातला वळवतील हा धोका लक्षात घ्यावा," असा टोला अग्रलेखात लगावला आहे.

"वेदांता-'फॉक्सकॉन'ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर POXEO हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना 'फॉक्सकॉन 'प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे," अशी भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे.

वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला. याच्याविरोधात आज (गुरुवारी) युवासेना प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंदोलन करणार आहे. सह्यांची मोहीम देखील राबवली जाणार आहे.

सकाळी 10 चर्चगेट स्टेशनच्या बाहेर युवासेनेतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. किर्ती कॉलेज, मुंबई सेंट्रल स्टेशन पश्चिम,गाडीअड्डा, परेल गौरीशंकर नाका, शिवाजी पार्क आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com