Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; बॅाम्बने गाडी उडवून देणार...

Threat Email to Eknath Shinde: मंत्रालय आणि जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा ई-मेल आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिंदे यांची गाडी बॅाम्बने उडवून देणार, अशी धमकी ईमेलमधून देण्यात आली आहे.
Threat Email to Eknath Shinde
Threat Email to Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या धमकीबाबत गोरेगाव पोलिसांना ईमेल आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मंत्रालय आणि जे.जे. मार्ग पोलिस ठाण्यात एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा ई-मेल आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिंदे यांची गाडी बॅाम्बने उडवून देणार, अशी धमकी ईमेलमधून देण्यात आली आहे.

अज्ञात व्यक्तीने हे धमकीचे ई-मेल एकनाथ शिंदे यांना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली येथे मुख्यमंत्रीपदाच्या शपथ विधी सोहळ्याला गेले आहेत. ते आज मुंबईला येणार आहेत.

Threat Email to Eknath Shinde
Parvesh Verma : मुख्यमंत्रिपदाचा पत्ता कट; भाजप नेत्याच्या निवासस्थानाबाहेर 'सन्नाटा'

त्यांना देण्यात आलेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सर्तक झाल्या आहेत. गोरेगाव पोलिस ठाणे, जेजे मार्ग पोलीस स्टेशन आणि मंत्रालय या तीनही ठिकाणी अज्ञात व्यक्तीने ईमेल करुन एकनाथ शिंदे यांना धमकी दिली आहे.

Threat Email to Eknath Shinde
Kolhapur News:' मुख्यमंत्री ग्रामीण विकास अँप'मुळे अधिकारी, सामान्यांची तारांबळ; काय आहे प्रकरण

मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे. यापूर्वीही एकनाथ शिंदे यांना अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. शिंदे दिल्लीहून मुंबईत आल्यावर तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरतील, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com