Devendra Fadnavis : लोकसभेचा पराभव जिव्हारी; फडणवीसांनी दिले मोठ्या राजकीय बदलाचे संकेत; म्हणाले, 'नव्याने पेरण्याची वेळ...'

Devendra Fadnavis resigns from the post of Deputy Chief Minister : "आमची प्रेरणा काय आहे, तर चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा सर्व गड जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज, मी निराश झालो असं वाटलं असेल तर ते खरं नाही."
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Devendra Fadnavis On Lok Sabha Election Result: पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्यात जे पेरलं जातं तेच उगवतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेसाठी जोमाने काम करण्याचा निर्धार केला. शनिवारी (ता. 8 जून) रोजी भाजपची विधानसभा आढावा बैठक दादरच्या भाजप कार्यालयात पार पडली, यावेळी ते बोलत होते.

या आढावा बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, "नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत. या बैठकीचं आयोजन केलं याचा आनंद आहे. या ठिकाणी आपण सगळे मोदींचं अभिनंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. मोदींना पंतप्रधान बनविण्यात याआधी आपला सिंहाचा वाटा होता पण यावेळी आपण कमी पडलो. नव्याने कामाला लागण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे."

यावेळी त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार आणण्याचा भाजपने निर्धार केल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "आपण सर्वांनी लोकसभेत मोठं यश मिळवण्याचा निर्धार केला होता. मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. ते यश का मिळालं नाही याची कारण शोधून ती दूर कशी करता येतील आणि विधानसभेला पुन्हा एकदा महायुतीचा सराकर कसं आणता येईल यासाठी जो आपण निर्धार केला याबाबत सर्वांचं अभिनंदन करतो."

तर आता पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्यात जे पेरलं जातं तेच उगवतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे, असं सूचक वक्तव्यही फडणवीसांनी केलं. तसंच सरकारमधून मोकळं करावं या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं, यशाचे बाप अनेक असतात, मात्र अपयशदेखील ताकदीने पचवायचं असतं, ते अंगावर घ्यायचं असतं. शिवाय या निवडणुकीत मी नेतृत्व केल्यामुळे मी अपयशाची जबाबदारी स्वीकारली. मी सर्वांचं अभिनंदन करेन कारण आपण सर्वांनी अतिशय उत्तम पद्धतीने या निवडणुकीत काम केलं.

Devendra Fadnavis
Kolhapur Constituency : संजय मंडलिकांचा 'गेम' कुणामुळे? कोल्हापुरात मुश्रीफ-घाटगे गटात 'ब्लेमिंग वॉर'

फडणवीस पळणारा नव्हे लढणारा व्यक्ती

मला मोकळं करुन काम करण्याची संधी द्या असं मी निराशेतून बोललो नाही, फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही तर लढणारा व्यक्ती आहे. आमची प्रेरणा काय आहे तर चारी बाजूनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा सर्व गड जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मी निराश झालो असं वाटलं असेल तर ते खरं नाही. असं म्हणत फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या आढावा बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com