Devendra Fadnavis Apologize : लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीसांनी चक्क मागितली माफी !

Jalna Maratha Reservation Protest : जालना घटनेवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Mumbai Political News : जालन्यातील आंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची घटना अंत्यत दुर्दैवी आहे. त्या घटनेचे सरकार समर्थन करत नाही. या लाठीमारीत अनेक आंदोलक जखमी झाले. या लाठीहल्ल्यामुळे आंदोलकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. याबद्दल सरकारच्या वतीने गृहमंत्री म्हणून दिलगीरी व्यक्त करत देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे माफी मागितली. दरम्यान, फडणवीसांनी या घटनेचे राजकारण करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. (Latest Political News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अथितीगृहावर सोमवारी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक झाली. तीन तासांहून अधिकवेळ झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलकांना झालेल्या त्रासाबद्दल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, "आंतरवाली सराटीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे सरकार समर्थन करत नाही. या लाठीमारीत अनेक आंदोलक जखमी झाले. आंदोलकांना अनेक यातना सहन करावा लागला. याबद्दल सरकारच्या वतीने मी आंदोलकांची माफी मागतो."

Devendra Fadnavis
Baramati Maratha March : ...नाहीतर बारामतीतून दोनशेजण निवडणूक लढवतील; बारामतीकरांचा अजितदादांना इशारा

मराठा आंदोलकांची माफी मागितल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपला मोर्चा विरोधकांकडे वळवला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधकांवर तीव्र शब्दात टीका केली. "पोलिसांनी केलेल्या हल्ल्यानंतर अनेक नेत्यांनी घटनास्थळी जात आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाठीहल्ल्याचे आदेश मंत्रालयातून आल्याचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहीत असेल की घटनास्थळावरील स्थिती पाहून असे निर्णय जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक घेत असतात," असे सांगत फडणवीसांनी नाव न घेता पवारांना लक्ष्य केले.

Devendra Fadnavis
Maratha Protest Baramati : 'सरकारचा भरला घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा'; बारामतीकरांचे आवाहन

फडणवीसांनी पुन्हा गोवारी आणि मावळ प्रकरण उकरून काढत तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, आताच्या घटनेत मंत्रालयातून आदेश दिल्याचे विरोधत बोलत असतील तर गोवारी लाठीचार्जमध्ये शेकडो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्याचे आदेश कुणी दिले होते. मावळातील गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, त्याचे आदेशही मंत्रालयातूनच आले होते का? त्यामुळे जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेवरून कुणीही राजकारण करत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असेही आवाहन फडणवीसांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com