Maratha Protest Baramati : 'सरकारचा भरला घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा'; बारामतीकरांचे आवाहन

Jalna Protest And Ajit Pawar : कडकडीत बंद असलेली बारामती घोषणांनी दणाणली
Baramati Maratha March
Baramati Maratha MarchSarkarnama

Pune Political News : जालन्यातील आंतरवाली सरटी येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. बारामती शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळून मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सर्वधर्मियांनी सहभाग घेतला होता. शहरातील भिगवण चौकात या मोर्चाचे सभे रुपांतर होऊन यावेळी कोण काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. या मोर्चात आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. (Latest Political News)

जालन्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर महाराष्ट्रात सरकारचा निषेध होऊ लागला आहे. महाराष्ट्रात सोमवारी ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे. बारामतीतही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जालन्यानातील घटनेचा निषेध करण्यासाठी बारामतीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सरकारच्याबाहेर पडा", अशा घोषणांनी बारामती दणाणली. या घोषणा देत मतदारांनी उपमुख्यमंत्री पवारांनी मतदारांनी सरकारमधून बाहेर पडल्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Baramati Maratha March
Raj Thackeray In Jalna : लाठीमाराचे आदेश देणाऱ्यांना मराठवाडाबंदी करून टाका; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे ?

मराठा बांधवाकडून बारामती (Baramati) बंदची हाक देण्यात आली असून मोठा मोर्चा काढण्यात आला. याचवेळी या रॅलीत अनेक मराठा बांधवांनी अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडण्याची विनंती करण्यासंबंधी घोषणा करण्यात आली. दरम्यान, काटेवाडीत रविवारी रास्तारोको करण्यात आला होता. त्यावेळीही 'अजित पवारांनी फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, किंवा त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे', अशी मागणी करण्यात आली होती.

Baramati Maratha March
Jalna Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा आरक्षणाचा अभ्यास 'फेल'; समितीच्या बैठका कागदोपत्री

जालन्यातील लाठीहल्ल्याचा राज्यभर निषेध होत आहे. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलने सुरू आहेत. यामुळे राज्यतील अनेक मार्गावरील विशेषत: मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे आंदोलन चिघळू नये असा उद्देश असला तरी अनेक प्रवाशी, विद्यार्थ्यांना याचा फटका सहन करावा लागला आहे. तसेच एसटी महामंडळाचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com