Devendra Fadnavis News: विधान परिषद निवडणुका,पावसाळी अधिवेशनाच्या गडबडीत फडणवीस अचानक राज्यपालांच्या भेटीला; 'हे' आहे मोठंं कारण

Devendra Fadnavis Met Governor Ramesh Bais : महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा चांगलाच वादळी ठरला होता. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
Devendra Fadnavis and Ramesh Bais
Devendra Fadnavis and Ramesh Bais Sarkarnama

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. लोकसभा निवडणुकीवेळी चढलेला राजकारणाचा ज्वर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता विधान परिषदा निवडणुका, पावसाळी अधिवेशन आगामी विधानसभा निवडणुका यांनी महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे.

अशातच एक मोठी घडामोड मंगळवारी (ता.9) घडली. कुणाच्या मनीध्यानी नसतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत राज्यपाल रमेश बैस आणि फडणवीस यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुका आणि पावसाळी अधिवेशनासह इतर राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेण्यामागं आणखी एक महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपालांसोबतच्या भेटीत महायुती सरकारच्यावतीने सुचविण्यात आलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीसाठी 12 नावे दिली आहेत. पण या आमदारांची नियुक्ती अद्यापही रखडली आहे.

Devendra Fadnavis and Ramesh Bais
Prakash Ambedkar : थेट प्रकाश आंबेडकरांना फोन करत असाल तर थांबा..! ‘वंचित’ची महत्वाची सूचना

आता शिंदे सरकारचा सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती फडणवीसांनी बैस यांच्याकडे करण्यात आल्याचे माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेत असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा चांगलाच वादळी ठरला होता. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) सत्तेतून पायउतार होईपर्यंत 12 आमदारांची नावे मंजूर केली नव्हती.यावरुन मोठं राजकारणही रंगले होते.

फडणवीसांचा पुढाकार

याचदरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली होती. गेल्या वर्षी न्यायालयाने या आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवल्यानंतर महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. आता रखडलेली 12 आमदारांचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुढाकार घेतला असल्याचे दिसून येत आहे.

विरोधकही राजभवनात ...

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही विरोधी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना विधान परिषदेच्या सभापतींची निवड याच अधिवेशनाच्या काळात करण्यात यावी अशी मागणी राज्यपाल बैस यांच्याकडे केली आहे.

Devendra Fadnavis and Ramesh Bais
Maharashtra Budget : विधानसभेसाठी सत्ताधाऱ्यांची 'मत पेरणी'; तब्बल 94 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com