Maharashtra's Political Crisis : कालपर्यंतच्या सर्व चर्चा फक्त थोतांड; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

SC Final Decision on Shiv Sena : निकालापूर्वी विरोधकांनी केलेल्या चर्चांचा घेतला समाचार
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis attacks on Thackeray Group : बहुप्रतिक्षेत असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गुरुवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून टीका केली जात होती. तसेच हे सरकार पडणार असल्याचा दावाही ठाकरे गटाकडून केला जात होता.

आज सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविले असते. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरतात, त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis
Supreme Court Live : सगळे निर्णय आमच्या बाजूने लागले; ठाकरे गटाचे वकील सिंघवींचा मोठा दावा...

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधकांनी कालपर्यंत केलेल्या चर्चा किती थोतांड होत्या हेच या निकालाने सिद्ध केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, "निकालामुळे आम्ही पूर्ण समाधानी आहोत. दरम्यान, कालपर्यंत काही लोक उड्या मारत होते की आज सरकार जाणार, त्यांच्या सगळ्या मुनसुभ्यांवर पाणी फिरले आहे. त्यांनी केलेल्या चर्चा किती थोतांड होत्या हेच या निकालावरून सिद्ध झाले आहे."

Devendra Fadnavis
Maharashtra Poltical Crisis: सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; अनिल परब म्हणाले...

दरम्यान, बुधवारी (ता. १०) फडणवीस यांनी या निकालाबाबत विश्वास व्यक्त केला होता. तसेच निकाल येईपर्यंत विरोधकांना वाट पाहण्याचा सल्लाही दिला होता. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "आमची केस मजबूत आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. योग्य निकाल येईल तोपर्यंत आपण थांबले पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे गांभीर्याने पाहिले पाहीजे. त्याबाबत अंदाज लावणे योग्य नाही. मात्र, आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत."

Devendra Fadnavis
Bharat Gogawale on Supreme Court Hearing: न्यायालयाने प्रतोदपदाची नियुक्ती बेकायदेशीर ठरवल्यानंतर गोगावले म्हणाले...

निकालापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. त्यावरही बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते, "माफ करा पण शब्द वापरतो, हा मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे कशाकरता राजीनामा देतील. त्यांनी काय चूक केली? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि पुढची निवडणूकही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार आहोत."

(Edited Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com