Bharat Gogawale on Supreme Court Hearing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमलेले व्हिप भरत गोगावले बेकायदेशीर आहे. असे न्यायालयाने म्हटले आहे. (Gogawle said after the court declared the appointment of Pratod post illegal)
शिंदे गटाने भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर होती. उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना पक्षनेते पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. पक्षातील फुटीबाबत विधानसभा अध्यक्षांना ३ जुलै रोजी माहिती होती. पक्षातील फुट दोन प्रतोद आणि नेत्यांच्या नियुक्ती हे मुद्दे अध्यक्षांना माहिती होते. पण अध्यक्षांनी त्याबाबत चौकशी करायला हवी होती. पण तरीही या प्रकरणात अध्यक्षांनी गोगावलेंची मुख्य प्रतोद म्हणून मान्यता दिली जी बेकायदेशीर होती, असं निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI Chandrachud) यांनी नोंदवलं.
न्यायालयाच्या या निर्णयावर बोलताना गोगावले म्हणाले की, 'न्यायालयाने जो निर्णय दिला तो मान्य आहे. पहिला पण मान्य आहे आणि आता पण मान्य आहे. न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो आम्हाला मान्यच करावा लागेल. प्रतोद पद मी मागितलं नव्हतं, पक्षातील इतर नेत्यांनी ठरवून मला ते पद दिलं आणि सर्वांनी ते मान्यही केलं. पण न्यायालयाने दिलेला निर्णय आमचे विधीज्ञ पाहतील आणि ठरवतील तो निर्णय़ मला मान्य आहे.'' (Supreme Court on Maharashtra Political Crises)
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत गुवाहाटी गाठले आणि तेथून महाराष्ट्रात परत येत सरकार स्थापन केले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेना ठाकरे गटाने 16 आमदारांना व्हिप पाळला नाही, म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आमदारांना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीच्या विरोधात १६ आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.