Bjp vs Congress : राहुल गांधींनी राजघराण्यांचा अपमान केला, महाराष्ट्र सहन करणार नाही; फडणवीसांचा गंभीर आरोप

Rahul Gandhi Speech Nagpur Rally Devendra Fadnavis Criticizes : नागपुरात आज काँग्रेसची मोठी सभा झाली....
Rahul Gandhi, Devendra Fadnavis
Rahul Gandhi, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : नागपूरमध्ये झालेल्या राहुल गांधींच्या सभेला महारॅली म्हणता येणार नाही. ती सूक्ष्म रॅली झाली. तिथे उपस्थिती अत्यंत कमी होती. आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून गेले. त्यांचे भाषण ऐकण्याचीही कुणाची तयारी नव्हती. है तयार हम, अशी त्यांची थिम होती. आता हे कशा करता तयार आहेत? हे आमच्या लक्षात आलेले नाही. पण लोक म्हणातायेत हम तयार नाहीं. तुम्हाला ऐकायचे नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील सभेवरून काँग्रेसला लगावला.

Rahul Gandhi, Devendra Fadnavis
Nagpur Congress Rally : राहुल गांधींचा दावा.. भाजपचे खासदारच सांगतात...

देशातील अनेक शूर राजे आणि राजघराण्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आणि आज राहुल गांधींनी सरसकट त्यांच्यावर टीका केली. देशातल्या राजांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, असे राहुल गांधी म्हणाले. अशाप्रकारे राजघराण्यांचा अपमान करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात आणि देशात हे कुणी सहन करणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विदर्भातल्या 47 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. जवळपास 18 हजार 399 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. यातून 2 लाख 23 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे विदर्भातील प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यांना चालना मिळाली आहे. मराठवाड्यातील 6 प्रकल्पांनाही सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. जवळपास 487 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत, तेही मार्गी लावाले आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गृहनिर्माण विभागाचीही आढावा बैठक घेतली. पोलिस कॉलनी, बीडीडी चाळ, म्हाडा कॉलनी या सर्वांच्या पुनर्विकासाच्या प्रश्नासह अनेक विषयांवर आम्ही निर्णय घेतले आहेत. मुंबईत विशेषतः म्हाडाच्या कामांना पुनर्विकासाला गती मिळणार आहे, सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

edited by sachin fulpagare

Rahul Gandhi, Devendra Fadnavis
Nagpur Congress Rally : चिठ्ठीत लिहून आले.. अन् खर्गे मराठीत बोलायला लागले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com