नखे कापून शहीद होण्याचा प्रयत्न : फडणविसांचा राऊतांना खोचक टोला

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातवरण तापले आहे.
Devendra Fadnavis, Sanjay Raut,
Devendra Fadnavis, Sanjay Raut,sarkarnama

मुंबई : लोकांच्या घरात घूसून, माप घेऊन नोटिसा पाठवता, असे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करीत विरोधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील 'ईडी'च्या कारवाईबाबत बुधवारी सूचक विधान केले. पुराव्यावरून नोटिस आली आहे, आता कायद्यानेच उत्तर द्या, असा खोचक सल्लाही फडणवीसांनी राऊत यांना दिला. काही लोक नखे कापून शहीद होण्याचा प्रयत्न करतात, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपच्या (BJP) स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी शिवसेना, संजय राऊत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांच्यावरील कारवाईमागे राणे यांना अधिश बंगल्याबाबत मुंबई महापालिकेने दिलेल्या नोटिशीचा आधार असल्याचे फडणवीस यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. 'ईडी'च्या कारवाईवरुन शिवसेनेच्या नेत्यांनी तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर केलेले आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावले. स्थापना दिनानिमित्त वसंत स्मृती कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान यांच्या व्हर्च्युअल सभेला आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, नरेंद्र पाटील, नीतेश राणे आदी उपस्थितीत होते.

Devendra Fadnavis, Sanjay Raut,
कोरोनानं पुन्हा हादरवलं; 'एक्सई'ची बाधा झालेला देशातील पहिला रुग्ण महाराष्ट्रात

यावेळी फडणवीस म्हणाले, किरीट सोमय्या यांच्याविरोधातील आरोपांत तथ्य नाही. तसा कोणताही पुरावाही नाही. भ्रष्टाचाराबाबत भाजप आणि सोमय्या बोलतच राहणार, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावर फडणवीस म्हणाले, राजू शेट्टी यांनी योग्य निर्णय घेतला.

Devendra Fadnavis, Sanjay Raut,
Imtiaz Jalil : पवार साहेब, पंतप्रधानांशी मलिकांबद्दल काहीच चर्चा केली नाही का ?

मनसे ही भाजपची 'सी' टीम असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर फडणवीस यांनी आदित्य यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कितवी टीम आहे, हे पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, अशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com