Devendra Fadnavis : मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची आहे, असे समजून लढा, असा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांना दिला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या निमित्त शहा यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मुंबईत आता ओरिजनल शिवसेना (Shivsena) आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवामध्ये सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते, त्यांना आता आपण मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे, असे समजा आणि लढा, असे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अभी नही तो कभी नही, असे म्हणत भाजपने शिवसेनेला इशारा दिला आहे. केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे फडणवीस म्हणाले. आपले 'मिशन मुंबई' साठी सर्व पदाधिकारी नगरसेवक भाजप कार्यकर्त्यांची महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी शहा म्हणाले, राजकारणात काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर आता वर्चस्व केवळ भाजपचे (BJP) असावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
शहा म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला आहे. राजकारणात सगळे काही सहन करा. मात्र, धोका सहन करू नका, असे अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2019 मधे पहिल्यांदा भाजपचे संपूर्ण बहुमताचे सरकार आले. असे पहिल्यांदाच झाले. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती, असा आरोपही अमित शहा यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ असे म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असेही शहा यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.