मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अमित शाह यांनी आज मुंबईतल्या लालबाग गणपतीचं दर्शन घेतले. तसेच त्यांनी वांद्रे येथे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती दर्शनासाठी गेले.
यावेळी अमित शाह (Amit Shah)यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ईत्यादी नेते उपस्थित होते. गणपती दर्शनानंतर ते मुंबई भाजपा पदाधिकारी आणि कोअर कमिटीसोबत बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुका काहीच दिवसांवर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी मुंबई महापालिकेच्या रणनीतीवर अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून भाजपा-मनसे युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाह आज भाजपा नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यामध्ये मुंबईची रणनीती ठरणार आहे. यात मनसेसोबतच्या युतीबाबत शक्यतेवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध बिघडल्यानंतर भाजपाला मुंबईत नवा मित्र हवा आहे. यामुळेच राज ठाकरेंसोबत भाजप युती करण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मुंबईत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यास मदत होईल, अशी भाजपची योजना आहे. मुंबईत लाखोंच्या सभा घेण्याची क्षमता राज ठाकरे यांच्याकडे आहे. यामुळे भाजपला मुंबईत फायदा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.