Narendra Modi Mumbai Sabha: राज ठाकरेंचे मोदी-शहा कनेक्शन व्हाया फडणवीसच..., पाहा कोणाची खुर्ची कुठे कशी?

Devendra Fadnavis: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या माध्यमातून राज यांनी शहांची भेट घेतली. त्यानंतर राज यांच्या मोदी-शहां कनेक्शनमध्ये फडणवीस कुठेच नाहीत हे दिसून आले. मात्र, या समीकरणामध्ये फडणवीस हेच हुकमी एक्का असल्याचे पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेतून दिसून आलं.
Narendra Modi, Devendra Fadnavis, Raj Thackeray
Narendra Modi, Devendra Fadnavis, Raj ThackeraySarkarnama

Narendra Modi-Raj Thackeray Shivaji Park Speech: लोकसभेची निवडणूक न लढवताही निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचंड मोठी छाप पाडण्याच्या उद्देशाने मोदी-शहांच्या राजकारणाला साथ देणाऱ्या राज ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये आपली भूमिका बदलली आणि 'कमळा'च्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार केला. सत्तेच्या राजकारणात कोणतीही वाटाघाटी न करता थेट मोदी-शहांसाठी राज्यभर मते मागण्याचा पवित्रा राज यांनी घेतला आणि काही सभाही गाजवल्या. याआधी मोदींच्या सभेमध्ये राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी उपस्थिती दाखवून राज्याच्या राजकारणात एक नवा संदेश दिला. (Narendra Modi-Raj Thackeray Shivaji Park Speech)

त्या पाठोपाठ आता राज यांनी आज शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात जोरदार भाषण करुन आपण मोदींसाठी काय आणि कसे करायला हवे, याचा संदेश दिला. अर्थात बदललेल्या राजकारणामध्ये राज यांचा मोदी-शहांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होता. त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांना टाळूनच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या माध्यमातून राज यांनी शहांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज यांच्या दिल्ली कनेक्शनमध्ये फडणवीसच...

त्यानंतर राज यांच्या मोदी-शहां कनेक्शनमध्ये फडणवीस कुठेच नाहीत हे दिसून आले. मात्र, या समीकरणामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच हुकमी एक्का असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेतून दिसून आलं. कारण मोदी आणि राज यांच्या खुर्चीमध्ये फडणवीस यांची खुर्ची होती. त्यामुळे राज यांच्या दिल्ली कनेक्शनमध्ये आपणही आहोत असा फडणवीसांचा मेसेज लोकांपर्यंत गेला.

'अब की बार चोरसो पार' म्हणत यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) काहीही करुन विजय संपादित करायचा या हितूने रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाने देशभरात आपली रणनीती आखली. कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपने आधी नेत्यांची जुळवाजुळव केली. यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेच्या (Shivsena) फुटीनंतर भाजपसोबत आलेला शिंदे गट आणि त्यानंतर काकांची साथ सोडून भाजपच्या साथीला गेलेली अजित पवारांची राष्ट्रवादी जोडीला असतानादेखील भाजपने थेट राज ठाकरेंना (Raj Thackeray) महायुतीत येण्याची विनंती केल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं.

Narendra Modi, Devendra Fadnavis, Raj Thackeray
Raj Thackeray News : राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींसमोरच तडाखेबंद भाषण; ठणकावून सांगितल्या '7' डिमांड

दरम्यानच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा (Amit Shaha) यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? याबाबतची भूमिका राज यांनी लगेच जाहीर केली नाही. परंतू, मनसे (MNS) महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा मात्र सुरू होत्या. अशातच राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज हे देखील महायुतीत सहभागी झाले.

मात्र, राज ठाकरेंनी अमित शहांची भेट घेतली, ते महायुतीत सामीलही झाले. परंतू या सर्व प्रक्रियेमध्ये राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा असणारे देवेंद्र फडणवीस कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे फडणवीसांना या सर्व प्रक्रियेत का टाळलं गेलं? अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतू आजच्या शिवाजी पार्कमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या खुर्चीमध्ये बसलेल्या फडणवीसांनी राज यांच्या दिल्ली कनेक्शनमध्ये आपणही आहोत असा संदेश लोकांपर्यंत पोहचवल्याचं दिसून आलं.

(Edited By Jagdish Patil)

Narendra Modi, Devendra Fadnavis, Raj Thackeray
PM Modi's Jahir Sabha at Shivaji Park : मोदींच्या सभेत राज ठाकरे, शिंदेंच्या सैनिकांचा इंगा, भाषण सुरु होताच 'पॅकअप'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com