Devendra Fadnavis : 'सीएम' पद अन् गृहखातं नाकारल्यानंतर शिंदेंसाठी फडणवीस मोठा त्याग करणार; 'हे' सर्वोच्च पद देणार?

Mahayuti Politics : राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे कॅप्टन देवेंद्र फडणवीस हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2022 राज्यात भाजपला पुन्हा ज्यांच्यामुळे सत्तेत एन्ट्री मिळाली, त्या शिंदेंसाठी खुद्द फडणवीस हे मोठा त्याग करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीनं न भूतो भविष्यती असं यश नकुत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलं. पण यशानंतर युतीत आधी मुख्यमंत्रिपद आणि खातेवाटप, मंत्रीपदं आणि पालकमंत्रिपदं यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांच्या काळात मोठी छाप पाडल्यानंतर एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दुसर्‍या टर्ममध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. तसंच रुसवे-फुगवे झाल्यानंतरही भाजपकडून त्यांना गृहखातं आणि नगरविकासही सोडले जाण्याची शक्यता कमीच आहे. या 'नाराजीनाट्या' नंतर आता महायुती सरकारच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

गेले काही दिवस रुसवे-फुगव्याचं राजकारण अनुभवल्यानंतरही भाजपकडून त्यांना गृहखातं आणि नगरविकासही सोडले जाण्याची शक्यता कमीच आहे. पण आमदार, कार्यकर्ते आणि स्वत:फडणवीसांनी मनधरणी केल्यामुळे शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहे. त्यांच्या चेहर्‍यावरील नाराजी लपून राहिलेली नाही.या नाराजीनाट्यानंतर आता महायुती सरकारच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे कॅप्टन देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 2022 राज्यात भाजपला पुन्हा ज्यांच्यामुळे सत्तेत एन्ट्री मिळाली, त्या शिंदेंसाठी खुद्द फडणवीस हे मोठा त्याग करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Mahayuti Politics: महायुतीतील 'या' नेत्यांनी मुंबईतच तळ ठोकला; मंत्रिपदानंतर आता पालकमंत्री पदासाठी 'बिग फाईट'

महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन शनिवारी(ता.7) सुरू झालं आहे. हे अधिवेशन 7,8 आणि 9 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतींची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

प्रोटोकॉलनुसार विधानभवन आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचं मुख्य नेतेपद हे मुख्यमंत्र्‍यांकडे असते.पण महायुती सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे.विधान परिषदेचं सभागृह नेतेपद देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसाठी सोडण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Markadwadi Voting : मारकडवाडीच्या ठिगणीचा देशभरात वणवा पेटणार, दिल्लीत अभ्यास सुरू; पटोलेंनी सांगितली अंदर की बात

महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे एक नंबरचे नेते आहेत. तर एकनाथ शिंदे हे दोन नंबर आणि अजित पवार हे तीन नंबरचे नेते मानले जातात. शपथविधी सोहळ्यातही अशाच क्रमाने या तीनही नेत्यांनी शपथ घेतल्याचे दिसून आले होते. त्यामुळे फडणवीस हे शिंदेंकडे विधान परिषदेच्या सभागृहाचं कामकाज सोपवण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आगामी काळात मोठी आव्हानं असणार आहे. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज पाहताना त्यांना तारेवरची कसरत लागणार हे नक्की आहे. त्याचमुळे कामकाज करणं सोपं जावं यासाठी फडणवीस शिंदेंना थेट विधान परिषदेच्या सभागृहाचं मुख्यनेतेपद देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com