Nagpur News : इथेनॉल निर्मितीवरील बंदी केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १५ डिसेंबर) रात्री मागे घेतली. त्याचा मोठा फायदा देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. हा निर्णय तातडीने घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भाजपवरील रागही काहींसा कमी होण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnavis thanked to central government for withdrawing ban on ethanol production)
नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी विशेषतः केंद्र सरकारने आभार मानतो. इथेनॉलच्या संदर्भात केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला होता. आमच्या सगळ्यांची जी काही मागणी होती, ती केंद्र सरकारपर्यंत पोचली. केंद्र सरकारने आमच्या मागणीचा विचार करून इथेनॉल निर्मितीच्या बंदीवरील निर्णयाचा फेरविचार केलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विशेषतः केंद्र सरकारच्या आग्रहावरून आणि केंद्र सरकारने अनुदान देऊन इथेनॉलच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लावली होती. विशेषतः उसाच्या रसापासून इथेनॉलनिर्मिती, बी हेविपासून इथेनॉलनिर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. त्यामुळे उसापासून इथेनॉलनिर्मितीवर बंदी आल्यामुळे काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असत्या, असेही फडणवीस यांनी कबूल केले.
ते म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की, यंदा साखरेचे उत्पादन कमी आहे, त्यामुळेच केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीवर बंदीचा निर्णय घेतला होता. त्याचे परिणामही आम्ही त्यांच्या नजरेस आणून दिले होते. आता आनंदाची गोष्ट आहे की, इथेनॉल निर्मितीवरील बंदीचा निर्णय सरकारने आता मागे घेतला आहे. त्याचा महाराष्ट्रातील उद्योगाला मोठा फायदा होणार आहे.
केंद्राने काय निर्णय घेतला; राजू शेट्टींनी काय मागणी केली
साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने मागील आठवड्यात बंदी घातली होती. मात्र, सरकारने आठवड्यातच आपला निर्णय मागे घेत उसापासून इथेनॉल निर्मितीस अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. उसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास सरकारने कारखान्यांना मुभा दिली आहे. मात्र, त्यासाठी केवळ 17 लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करता येणार आहे. त्यामुळे इथेनॉलनिर्मितीमध्येही सरकारी खोडा असणार आहे. पण, केंद्राने अंशतः का होईना सरकारने साखर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दरम्यान, इथेनॉल निर्मितीसाठी साखरेची हीच मर्यादा 34 लाख टनांपर्यंत देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.