Thackeray Vs Fadnavis : उद्धव ठाकरे अन् फडणवीसांमध्ये खलबतं; दिल्लीतही बड्या नेत्यांमध्ये बैठक?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. त्यातच ठाकरेंनी दिल्लीत कुणाच्या भेट घेतल्या? हे उघड करावे, असं आव्हान वंचितनं दिलं आहे.
devendra fadnavis | uddhav thackeray.jpg
devendra fadnavis | uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

2019 ते 2024 या पाच वर्षांच्या कार्यकाळात राजकीय घडमोडींनी जनता चक्रावून गेली. अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली शपथ, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन असो, शिवसेनेतील फूट किंवा महायुतीचं सरकार स्थापन असो, अथवा अजितदादांनी महायुतीला पाठिंबा असो. अशा घडामोडींमुळे पाच वर्षांत कधी नव्हे ते एवढ्या उलथापालथ झाल्या. आता वंचित बहुजन आघाडीनं खळबळजनक दावा केला आहे.

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. त्यासह शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भेट घेतल्याचं सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं आहे. मोकळे यांनी केलेल्या दाव्यानंतर आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार नाहीत ना? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सिद्धार्थ मोकळे म्हणाले, "शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे 25 जुलै रोजी रात्री दोन वाजता 7 डी मोतीलाल मार्केट येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले. नंतर 5 ऑगस्टला रात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'मातोश्री' बंगला येथे स्वत:हा गाडी चालवत गेले. ठाकरे आणि फडणवीसांमध्ये दोन तास चर्चा झाली. त्यानंतर 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले. दिल्लीत जाताना सोबत कोण कोण होते, दिल्लीत कुणाच्या गाठीभेटी केल्या हे उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावे."

devendra fadnavis | uddhav thackeray.jpg
Laxman Hake : राड्यामागे कुणाचा हात? हाकेंनी सगळंच सांगितलं; संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख करत डागली तोफ

"आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी आहेत, हे माहिती आहेत. त्याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केलं आहे. पाच वर्षांत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा उलट-सुलट घडामोडी घडल्या, तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी जनतेची आणि मतदारांची फसवणूक होऊ नये, म्हणून ही माहिती समोर ठेवत आहोत," असं सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com