Shashikant Warise Death News Update : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणाची एसआयटी मार्फेत चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा जोरात उचलून धरला होता. त्यावर आता शिंदे-फडणवीस सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
वारीसे यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान राऊतांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, याबाबत राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वारीसे प्रकरणात आम्ही (शिवसेना) आवाज उठवू नये, म्हणून मला धमकी देण्यात आली आहे. 'तुमचाही शशिकांत वारीसे करु,'अशी धमकी दिल्याचे राऊतांनी सांगितले.
"शशिकांत वारिसे यांची हत्या हे प्रकरण गंभीर असून याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पत्रकाराची ही अवस्था झाली असेल तर याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेने चाललेय हे समजून घ्यावे," असे पवार म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.