Sanjay Raut :"तुमचाही शशिकांत वारीसे करु.." ; संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी..

Shashikant Warishe Murder Case : पत्रकाराची ही अवस्था झाली असेल तर याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेने चाललेय हे समजून घ्यावे," असे पवार म्हणाले.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama

Shashikant Warishe Murder Case : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे, त्यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकार संघटनांसह अनेक राजकीय नेत्यांनी वारीसे प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान राऊतांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वारीसे प्रकरणात आम्ही (शिवसेना) आवाज उठवू नये, म्हणून मला धमकी देण्यात आली आहे. 'तुमचाही शशिकांत वारीसे करु,'अशी धमकी दिल्याचे राऊतांनी सांगितले.

Sanjay Raut Latest News
Kirit Somaiya : हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा ? ; सोमय्यांकडून Video व्हायरल..

"शशिकांत वारिसे यांची हत्या हे प्रकरण गंभीर असून याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पत्रकाराची ही अवस्था झाली असेल तर याचा अर्थ राज्य कोणत्या दिशेने चाललेय हे समजून घ्यावे," असे पवार म्हणाले.

"वासीसे यांचा अपघात नसून घात आहे, त्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची गांभीर्यीने चौकशी करावी, वारीसे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत करावी, अशी मागणी राऊतांनी फडणवीसांना पत्रातून केली. "देवेंद्रजी, राज्यात कायदा सुवस्थेचं काय सुरु आहे," असा रोखठोक सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

"शशिकांत यांनी ज्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली. तो कारचालक पंढरीनाथ आंबेरकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार वारीसे यांच्या गाडीला जोरदार धडक देते. त्यात वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे, असे पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com