Devendra Fadnavis News : "भानगडीत पडू नका, जशास तसं उत्तर दिलं जाईल", फडणवीसांचा ठाकरेंना थेट इशारा

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असलेल्या उत्तर-प्रत्युत्तरामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
uddhav thackeray devendra fadnavis
uddhav thackeray devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांच्या 'मुख्यमंत्रिपदा'वरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी 'नालायक', 'कोडगं' म्हणत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. याला 'जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल,' असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं वादाला सुरूवात कुठून झाली?

"आदित्यला ( Aaditya Thackeray ) मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं ठरवलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तेचं सम-समान वाटप होईल. शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद पद असेल, असं अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरलं होतं. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार होते. खुद्द फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं. मात्र, फडणवीसांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं," असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत"

यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, "आमचे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ठ झाले आहेत. त्यांना वेड लागलं असेल, मला नाही लागलं. कुठल्यातरी खोलीत नेऊन मुख्यमंत्री करतो, असं सांगितल्याचा उद्धव ठाकरेंना भ्रम होता. आता आज भ्रम बदलला असून मी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार असल्याचं ते बोलत आहे. पण, पहिलं उद्धव ठाकरेंनी ठरवावं, मी की अमित शाहांनी त्यांना शब्द दिला होता. खुर्ची गेल्यापासून यांना काहीही समजत नाही. त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटे बोलतात. आदित्य ठाकरेंना विधानसभा लढविण्यास सांगा हे मी सांगितलं होतं. पण, मुख्यमंत्री सोडा, तर मंत्री बनवण्याचा विचारही नव्हता."

"लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस फडणवीस"

देवेंद्र फडणवीसांचं 'कुठल्यातरी खोलीत' हे विधान उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागलं असून एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली आहे. "देवेंद्र फडणवीसांनी जनाची नाहीतर मनाची ठेवावी. लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस फडणवीस आहेत. तुमच्यासाठी बऱ्याच खोल्या असतील. त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता, आम्ही बघू इच्छित नाही. पण, ज्याला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणता, ती 'मातोश्रीती'ल मंदिर आणि बाळासाहेबांची खोली आहे. त्याच खोलीत बाळासाहेबांच्या फोटोसमोर अमित शाह नाक रगडायला आले होते. तेव्हा, त्याच खोलीत दोन मोठी माणसं बोलत असल्यानं तुम्हाला अमित शाहांनी तुम्हाला बाहेर बसायला लावलं होतं. त्या खोलीला तुमच्यासारखा नालायक माणूस कोणतीतरी खोली म्हणतो. मात्र, माझ्या भावना बाळासाहेबांच्या खोलीबद्दल अत्यंत संवेदनशील आहेत."

uddhav thackeray devendra fadnavis
Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'बारामतीकरांच्या मनातील सूनबाई दिल्लीला नक्की जाणार'; फडणवीस यांचा शरद पवारांना टोला !

"शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते"

आता देवेंद्र फडणवीसांनी 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर केला, करतो आणि करीत राहू. पण, ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यागले, त्यांचा आदर आम्ही करु शकत नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीने त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. म्हणूनच ते आजही आमच्यासाठी वंदनीय आहेत. दररोज एकेक कपोलकल्पित कथानक तयार करुन कुणाची दिशाभूल करता? स्वत:चीच ना?" असा सवाल फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

"महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही"

"महाराष्ट्राचे समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलिम-जावेदची स्क्रिप्ट नाही. समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रीप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका. जशास तसे उत्तर दिले जाईल!" असा इशारा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

uddhav thackeray devendra fadnavis
Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी, फडणवीसांचंही जशास तसं प्रत्युत्तर ; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com