Devendra Fadnavis Latest News : फडणवीसांनी ठाकरे- पवारांची लाज काढली

Devendra Fadnavis Press Conference : कंत्राटी भरतीचे पाप पवार, ठाकरेंचेच
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnvis : कंत्राटी नोकर भरतीवरून सध्या शिंदे-फडणवीस - पवार सरकार आणि विरोधी बाकांवरच्या नेत्यांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या मुद्द्यावरून सरकारला उघडे पाडण्याचा विरोधकांचा इरादा असतानाच आपल्या सरकारवरील 'कंत्राटी'चे डाग पुसण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयारीनिशी उतरले आहेत.

'कंत्राटीचे जुने निर्णय, आदेश दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर पटलवार केले. कंत्राटी नोकर भरतीचा पहिला निर्णय काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात २००३ मध्ये झाला असून, तेव्हा, पहिल्यांदा शिक्षण खात्यात निर्णयाची अंमलबजावणी झाल्याचे सांगून फडणवीसांनी विरोधक आता मुखवटे घालून बोलत असल्याकडे लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil : पुण्यात जरांगे पाटलांची सभा; आज पुन्हा एकदा मराठे एकवटणार

आघाडी सरकारने हे पाप करूनही विरोधात गेल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांच्या नावाने गळा काढत असल्याचे सांगून फडणवीस यांनी विरोधी नेत्यांची लाज काढली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा मुद्द्यावर त्यांनी भूमिका मांडली. कंत्राटी नोकर भरती, त्यामागचे राजकारण, आता विरोधकांची भूमिका यावरही फडणवीस भाष्य केले आणि विरोधकांना सडकून काढले.

पहिल्या टप्प्यांत फडणवीसांनी कंत्राटी नोकर भरतीचे जुने आदेश काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नावे घेत, फडणवीसांनी कंत्राटी भरतीचे खापर आघाडी सरकार आणि अलीकडच्या काळातील महाविकास आघाडी सरकावर फोडले. विरोधकांचे आरोप खोडून काढताना सरकारची कामगिरी कशी उजवी आहे, हे पटवून सांगण्यासाठी फडणवीस यांनी अनेक दिवसांनी आवर्जून मीडियापुढे आले. तेव्हाच नोकरी भरतीचा जुन्या आदेशाच्या तारखा मांडताना फडणवीसांनी आपल्याकडे खूप पुरावे असल्याचेही जाहीरपणे सांगितले. दुसरीकडे खरोखरीच, फडणवीसांकडे मोठी फायली होती, तिच्याकडे माध्यमांच्या प्रतिनिधींचे लक्ष वेधून 'मी सगळ्या एक्सपोज' करणार असल्याचे सांगायला फडणवीस विसरले नाही.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Contract Recruitment : कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय पृथ्वीराज चव्हाणांचा, फडणवीसांनी विरोधकांना उघडं पाडलं

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com