Devendra Fadnavis On Morning Oath : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या बैठकीनंतरच ! फडणवीसांचा खळबळजनक दावा

Sharad Pawar Behind Morning Oath : स्थिर सरकारसाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याचे अश्वासन
Devendra Fadnavis, Sharad Pawar, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis On Sharad Pawar : भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रात दीड दिवसाचे सरकार स्थापन झाले होते. या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बैठक घेतल्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाल्याचा खळबळजनक दावा फडणवीस यांनी केला आहे. (Latest Political News)

देवेंद्र फडणवीस एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत हा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. मात्र अजित पवार यांच्यासोबत शपथ घेण्याच्या चार दिवस आधी त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे नियोजन पुढे आमलात आणता आल नसल्याचाही दावा फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

Devendra Fadnavis, Sharad Pawar, Ajit Pawar
MLA Teach Student : आमदार बनले शिक्षक! विद्यार्थ्यांना शिकवले अन् अधिकाऱ्यांनाही दिले महत्वाचे आदेश

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी नाते तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी बोलणी सुरू केली होती. त्यांनी आमचा फोनही उचलणे बंद केले होते. त्यांना 'खुर्ची' बोलावत असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यावेळी याला पर्याय काय आहे याचा विचार केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही लोक स्थिर सराकर देण्यासाठी आमच्यासोबत येण्यास तयार असल्याचे समजले. त्यानुसार शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यात राज्यात सरकार बनवण्याचे ठरवण्यात आले. ते सरकार कसे असेल याबाबतचे सर्व निर्णय मी आणि अजित पवार यांनी घ्यायचे असे ठरले होते."

सर्व काही ठरले असताना पवार यांनी ऐनवेळी माघार घेतल्याचेही दावा फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, "बैठकांमध्ये ठरल्यानुसार मी आणि अजित पवार यांनी सर्व तयारी केली. त्यानंतर एका क्षणी पवार यांनी माघार घेतली. ती वेळ शपथविधीच्या तीन-चार दिवस आधीची असेल. पवार यांच्या माघारीमुळे अजित पवार यांच्यापुढे पेच निर्माण झाला. मधूनचे माघार गेले असते तर अजितदादा संपले असते. त्यामुळे पर्याय नसल्याने अजित पवार यांनी माझ्यासोबत शपथ घेतली."

Devendra Fadnavis, Sharad Pawar, Ajit Pawar
Dombivli Protest News: आनंद दिघेंनी सुरू केलेली दुर्गाडी देवी पायथा आंदोलन ३७ व्या वर्षीही सुरूच; शिवसेनेचे दोन्ही गट पहिल्यांदाच एकत्र...

शपथ घेतल्यानंतर पवारांकडून पाठिंबा मिळण्याची आशा होती, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या अनेक बैठकांमुळे अजित पवार आणि मी शपथ घेतली होती. त्यामुळे त्यानंतर शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार पाठिंबा देतील असा विश्वास अजित पवार यांना होता. मात्र शपथविधीनंतर ना शरद पवार आले ना राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर आमदार आले. त्यामुळे आमचे सरकार लवकरच कोसळले."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com