Devendra Fadnavis: ठाकरे गटाला फडणवीसांनी पुरावाच दिला; फोटो शेअर करीत म्हणाले "बाबरी मशिद पडली तेव्हा मी तिथेच..

Ram Mandir: कारसेवेला जातानाचा हा फोटो...
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News: अयोध्येत उद्या (ता.22) श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. बाबरी पाडण्यावरुन देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची वर्षभरापासून या मुद्यांवर चांगली जुपंली आहे. "बाबरी मशिद पडली तेव्हा मी तिथेच होतो, उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक जे आज विधाने करत आहेत, त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. सर्वजण घरात गुपचूप बसले होते," असे फडणवीसांनी यापूर्वी सांगतिले आहे. त्याचा पुरावा त्यांनी आज सोशल मीडियावर दिला आहे.

फडणवीसांना जुना फोटो शेअर करीत ठाकरेंना उत्तर दिलं आहे. अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून फडणवीसांनी आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. विदर्भातील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला फोटो फडणवीसांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. कारसेवेला जातानाचा हा फोटो आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंना पुरावा दिला आहे.

उद्या सोमवार 22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडियावर एक फोटो प्रसिद्ध केलाय. कारसेवकांसोबत अयोध्येला जात होतो, असा फडणवीसांनी दावा केला.

दरम्यान, केंद्र सरकारने या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारनेही उद्या सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.या सुट्टीला चार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष खंडपीठाच्या न्यायाधीश जी.एस. कुलकर्णी आणि निला गोखले यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

वेदांत अग्रवाल, शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, आणि खुशी बंगिया या विधी शाखेच्या चार विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने स्वतःला कोणत्याही धर्माशी जोडू नये किंवा कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन देता कामा नये, असाही युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे घटनेत समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, असे त्यांचे म्हणणं होते.

केंद्र सरकारने उद्या (सोमवारी) अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारसह अन्य आठ राज्यांनीही सुटी जाहीर केली आहे. त्याला विरोध करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

राज्यात सुटीबाबतचा निर्णय घेण्याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारकडे सोपवला होता. त्यानुसार राज्याने आपल्या अधिकाराचा वापर करून 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. या अध्यादेशावर उप सचिव रो. दि. कदम पाटील यांची स्वाक्षरी आहे.

Devendra Fadnavis
BJP Election Politics: उमेदवारीच्या पारंपरिक निकषांना छेद देण्यात भाजप यशस्वी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com