अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध होणार? राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Andheri East by-election : भाजपने (BJP) अंधेरी पोट निवडणूक लढवू नये, असे पत्र राज ठाकरे यांनी पाठवले आहे
raj thackeray, devendra fadnavis Latest News
raj thackeray, devendra fadnavis Latest News sarkarnama

Andheri East by-election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडमुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांच्यात थेट लढत होत आहे.

ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजप तसेच उद्धव ठाकरे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारला जात होता. असे असतानाच महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपला आवाहन केले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.

raj thackeray, devendra fadnavis Latest News
BJP : ठाकरेंनी घेतला धसका ; जेवतानाही त्यांना शिंदे-फडणवीसच दिसत असतील ; बावनकुळेंचा टोला

राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांच्या पत्रावर मी काही एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मला माझ्या सहकार्यांशी चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषीत केला आहे. या पूर्वी ज्या प्रकारे आम्हाला जेव्हा, जेव्हा योग्य प्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही तशी भूमिका घेतली आहे.

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीवेळी आम्ही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. पण, या टप्यावर काही भूमिका असेल तर ती मला घेता येत नाही. त्यासाठी आमच्या पक्षात चर्चा करावी लागले, आमच्या सोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे, त्यामुळे मला मुख्यमंत्री शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागले. ही सगळी चर्चा झाल्यानंतरच मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करु शकेल. राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठवले आहे. आम्ही त्या पत्राचा विचार करु, निर्णय जो काही घ्यायचा आहे, तो चर्चा करुनच घेऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.

raj thackeray, devendra fadnavis Latest News
Abdul Sattar : बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले म्हणून कम्युनिस्ट, वंचित जवळ आले..

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. ''दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. त्यांची अगदी शाखा प्रमुखापासून वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हणाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com