Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीस, कौतुक मात्र...

Devendra Fadnavis In Thane : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काय बोलले?
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

पंकज रोडेकर -

Thane Devendra Fadnavis News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात उपमुख्यमंत्री तथा भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला.

राम राज्य ही संकल्पना संत तुकाराम महाराजांनी मांडली. त्यानंतर ती संकल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सातत्याने मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रामराज्य ही संकल्पना मांडताना, दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त भारत, महिला सन्मान भारत आदी संकल्पना मांडल्या आहेत. ज्या दुर्जन शक्ती आहेत. त्या शक्ती भारतामध्ये दहशतवाद माजवणाऱ्या आणि भारताला खिळखिळी करीत आहे. त्यासाठी आज आवश्यकता पडली तर सर्जिकल स्ट्राइक होतो. आवश्यकता पडली, तर एअर स्ट्राइक होतो आणि 370 कलम हटवून अशा शक्तीला सांगितलं जातं, की भारताचे तुकडे आम्ही तुम्हाला करून देणार नाही. त्यामुळे दहशतवादमुक्त राज्य श्रीरामांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होत आहे, असे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis हे शनिवारी ठाण्यात आयोजित रामायण महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Thane Politics : अजितदादांच्या नेत्याला भावी आमदारकीच्या शुभेच्छा; शिंदे गटाने आव्हाडांना खिजवलं

रामराज्य म्हणजे गरिबांनादेखील अधिकार देणारे राज्य, रामराज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा विचार करणारा राजा, रामराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये अंतिम व्यक्तीचा विचार आणि त्याचे दुःख हे राजापर्यंत पोहोचतात आणि ते दुःख दूर करण्याचं काम राजा करतो ते खऱ्या अर्थानं रामराज्य आहे, असेही फडणवीस म्हटले. तसेच गेल्या नऊ वर्षांमध्ये गरिबी निर्मूलनाचा जो कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांनी हातामध्ये घेतला, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशामध्ये नऊ वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्यावर आले आहेत. हा जगाच्या इतिहासातला एक रेकॉर्ड असल्याचे फडणवीस यावेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो. पण शेवटच्या माणसाला पंधराच पैसे मिळतात. 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, असा आरोप करीत मोदी यांनी सांगितलं, एक रुपया पाठवीन, तर तो पूर्ण शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. एक पैसा कोणाला खाऊ देणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त अशा प्रकारची व्यवस्था ही मोदी यांनी तयार केल्याचेही ते म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आपण रामराज्य स्थापित करून अशा प्रकारचा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला माजी खासदार व आयोजक विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदी उपस्थित होते.

R...

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Kalyan Dombivli Politics : भाजप नेत्यांना खूष करण्याचा शिंदेंचा प्रयत्न; काय आहे राजकीय खेळी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com