Kalyan Dombivli Politics : भाजप नेत्यांना खूष करण्याचा शिंदेंचा प्रयत्न; काय आहे राजकीय खेळी?

Shiv Sena Shinde Gat Politics In Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाची काय आहे खेळी?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Kalyan Lok Sabha Constituency Politics News :

कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. या लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे लोकसभा निवडणूक महायुतीकडून तिसऱ्यांदा लढणार आहेत. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे.

याआधीच्या निवडणुकीतही त्यांनी अमृत योजना या विषयाचा वचननाम्यात उल्लेख केला होता. अमृत 2.0 या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यामुळे भाजपला देखील या योजनेच्या यशात त्यांनी सहभागी करून घेतले. स्थानिक भाजपचे नेतेही खुश झाल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांना त्याचा फायदा होऊ शकतो.

Lok Sabha Election 2024 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा एका आठवड्यात महाराष्ट्रात दुसरा दौरा सोलापूर येथे पार पडला. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अमृत 2.0 या योजनेअंतर्गत मोहिली येथे 275 द.ल.लि क्षमतेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या उदंचन केंद्राचे भूमिपूजन PM Modi यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या उद्घटनांमुळे निवडणुकांचे पडघम पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde
Thane Politics : अजितदादांच्या नेत्याला भावी आमदारकीच्या शुभेच्छा; शिंदे गटाने आव्हाडांना खिजवलं

उदंचन केंद्रामुळे सद्यस्थितीतील मौजे बारावे येथील 144 द.ल.लि जलशुद्धीकरण केंद्र व मौजे गौरीपाडा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या 95 द.ल.लि केंद्रातून महापालिका क्षेत्रातील सुमारे 22 लक्ष नागरिकांना व भविष्यात सन 2055 पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.

मोहने उदंचन केंद्र हे सुमारे 40 ते 45 वर्षे जुने आहे. या नवीन उदंचन केंद्रामुळे मोहने उदंचन केंद्राच्या देखभाल दुरुस्ती व जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणावर होत असलेल्या खर्चात वार्षिक रुपये 0.75 ते 1.00 कोटी इतकी बचत होणार आहे. मोहिली गावाजवळ पाण्याची पातळी खोल आहे. पाणी स्वच्छ असल्यामुळे नागरिकांना पुरेसा व शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने विकसित होत असलेल्या भागाला पाणी पुरवठा करणे सुलभ होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण येथील आचार्य अत्रे रंगायतन येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे उपस्थित होते. एकंदरीतच नागरिकांना खुश करून मत मिळवण्याच्या उद्देशाने या सर्वच योजनांचा शुभारंभ केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

edited by sachin fulpagare

Eknath Shinde
Shrikant Shinde : कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंसाठी 'तो' प्रश्न ठरणार अडचणीचा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com