Devendra Fadnavis : राज्यात तीन नाही तर चार विरोधक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं चौथ्याचे नाव...

Mahayuti Vs MVA : देवेंद्र फडणवीसांनी राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, याची आठवण करून देत विरोधकांना टोला लगावला.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष खडबडून जागे झाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आता विधानसभेतही महायुतीला धूळ चारू अशी भागा महाविकास आघडीतील नेते करत आहेत.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, याची आठवण करून देत राज्यात तीन नाही तर चार विरोधक असल्याचे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, लोकसभेत मविआचा विजय झाला, असे विरोधक म्हणतात. मात्र 2 लाख अतिरिक्त मतांमुळे त्यांनी 30 जागा जिंकल्या आहेत. आपण निर्धार केला तर किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील. राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, असा टोलाच फडणवीसांनी विरोधकांना लगावला.

लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटे बोलत होते. मात्र आपणही गाफील राहिलो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशीही आपल्याला लढावे लागले. सत्य चिरकाळ जिवंत राहते. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल दुसरी नाही, असे म्हणत विरोधकांना खोटं बोलायची चटक लागली. ते घरी तरी खरं बोलत असतील का, अशी टीका फडणवीसांनी केली.

Devendra Fadnavis
Maratha Reservation : सरकार लवकरच सगे-सोयऱ्यांची अधिसूचना काढणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

आपण सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडले पाहिजे. लाडकी बहीण योजनेला नावं ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेल. कामे करणारे कोण आणि कोण बोल बच्चन हे लोकांना माहिती आहे, अशा शब्दात फडणवीसांची विरोधकांचा समाचार घेतला.

लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत. शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची थेट मदत देण्याचे काम महायुतीने केले. 120 सिंचन प्रकल्पांना सुप्रमा देण्याचे काम आपण केले. नदीजोड प्रकल्पामुळे राज्यातील दुष्काळ नामशेष होईल, यावरही फडणवीसांनी प्रकाश टाकला.

(Edited by Sunil Dhumal)

Devendra Fadnavis
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : राजकीय फडात T-20 वारं; ठाकरेंचा नेता म्हणतो, राज्यात 'त्रिफळा' उडवणारच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com