अजितदादांसाठी लढाई सोपी नाही : देवेंद्र फडणवीस घेणार पुण्याचा चार्ज!

अगामी महापालिका निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) असा सामना रंगणार आहे
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकांवर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला शह देत सत्ता मिळावली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुण्याचे पालकमंत्री झाले होते. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत व्यक्तीगत लक्ष देत होते. राज्यातील सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी पुन्हा महापालिकांमध्ये सत्ता मिळवणार अशी सुरू होती. मात्र, आता सत्तांतर झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुण्याचा चार्ज घेणार आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांची घोषणा, कृषी विद्यापीठांना आदेशाची प्रतीक्षा !

राज्यात महाविकास विकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंच्या गटासोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांच्यकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपुरला गेले होते. तिथे त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. आता ते आपल्या कामाला लागणार असून पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा ते आढावा घेणार आहेत.

पुणे महापालिकेवर सध्या प्रशासन आहे. आगाामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे फडणवीसांची पुणे भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना बदलून चार ऐवजी तीनचा प्रभाग केला आहे. ही प्रभाग रचना भाजपसाठी अडचणीची असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. त्यामुळे पुणे दौऱ्यात फडणवीसांसमोर स्थानिक नेत्यांकडून प्रभाग रचनेसंदर्भातील अडचणी मांडल्या जावू शकतात, असे सांगितले जात आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
CM Eknath Shinde: फडणवीसांनी हाताला धरुन शिंदेंना मुख्यमंत्र्यांंच्या खुर्चीत बसवले...

मुंबईनंतर, पुणे महापालिका महत्वाची आहे. त्यातच पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे अगामी महापालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com