CM Eknath Shinde: फडणवीसांनी हाताला धरुन शिंदेंना मुख्यमंत्र्यांंच्या खुर्चीत बसवले...

Devendra Fadnavis | Eknath Shinde | मंत्रालयातील आजचे दृश्य पाहून फडणवीस यांची नाजारी निश्चितपणे दुर झाली असल्याचे चित्र
Devendra Fadnavis News, Eknath Shinde News, Latest Political News
Devendra Fadnavis News, Eknath Shinde News, Latest Political NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पक्षनेतृत्वाने अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावल्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मागील आठवड्याभरापासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातून त्यांची अवनती झाले असल्याचेही बोलले गेले. फडणवीस यांचे समर्थक आमदार देखील सत्ता आली पण सत्तेच्या चाव्या गेल्या अशी भावना खाजगीत व्यक्त करत होते. हीच गोष्ट लक्षात घेवून फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत कोणीही नाराज होण्याचे कारण नाही, हे आपलं सरकार आहे, आपल्या हक्काचे सरकार आहे, असे सांगत आमदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला होता. (Latest Political News in Marathi)

मात्र आजच्या मंत्रालयातील दृश्यानंतर फडणवीस यांची नाजारी निश्चितपणे दुर झाली असल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेत मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनातून कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधिनंतर त्यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु, आज प्रथमच ते मंत्रालयातील दालनात आले. तसेच लगेचच त्यांनी विविध विषयांवरील बैठका घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांना आग्रह करत, शिंदे यांना हाताला धरुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवले. तसेच पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छाही दिल्या. काही वेळात मुख्यमंत्र्यांच्या शेजारी दुसरी खुर्ची लावून ते स्वतः त्यात बसले आणि मुख्यमंत्र्यांसोबत कामकाजाचा आढावा घेतला. या संपूर्ण वेळी फडणवीस कुठेही नाराज दिसले नाहीत, ते अत्यंत उत्साहात असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आदी उपस्थित होते. यावेळी आमदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com